
जॅनिक सिन्नर २३ वर्षांचा आहे. हा तरुण गुणी टेनिसपटू रविवार ७ जून २०२५ रोजी अंतिम सामन्यात स्पेनचा जागतिक क्रमांक दुसऱ्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझ विरोधात खेळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीने कार्लोस अल्काराझविरुद्धचा सामना अर्ध्यावर सोडला. आठव्या मानांकित मुसेट्टीने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अल्काराझ ४-६, ७-६ (३), ६-०, २-० ने आघाडीवर होता.
जॅनिक सिन्नर पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सिन्नरच्या नावावर आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन (२०२४) एकदा जिंकले. दुसरीकडे, जर अल्काराजने अंतिम फेरी जिंकली तर ते त्याचे दुसरे फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद असेल. अल्काराज या २२ वर्षांच्या खेळाडूने आतापर्यंत दोन विम्बल्डन (२०२३, २०२४), एक फ्रेंच ओपन (२०२४) आणि एक यूएस ओपन (२०२२) जेतेपदे जिंकली आहेत.