Friday, October 24, 2025
Happy Diwali

फिल्ममेकर मनिष गुप्ताने स्वतःच्याच ड्रायव्हरवर केला चाकू हल्ला

फिल्ममेकर मनिष गुप्ताने स्वतःच्याच ड्रायव्हरवर केला चाकू हल्ला
मुंबई : अभिनेत्री रविना टंडन, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह अनेक कलाकारांना घेऊन फिल्ममेकिंग करणाऱ्या फिल्ममेकर मनिष गुप्ताने स्वतःच्याच ड्रायव्हरवर चाकू हल्ला केला. ही धक्कादायक घटना वर्सोवा येथे सागर संजोग इमारतीत मनिष गुप्ताच्या घरात घडली. रजिबुल इस्लाम लष्कर नावाचा वाहन चालक तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून फिल्ममेकर मनिष गुप्ताकडे काम करत होता. मनिष गुप्ता आणि रजिबुल इस्लाम लष्कर या दोघांच्यात पगाराच्या मुद्यावरुन मतभेद झाल्याचे वृत्त आहे. वाद वाढला आणि मनिष गुप्ताने रजिबुल इस्लाम लष्करवर चाकू हल्ला केला. या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी मनिष विरोधात गुन्हा नोंदवला आहे. रजिबुल इस्लाम लष्करने दिलेल्या माहितीनुसार तो मनिष गुप्ताकडे दरमहा २३ हजार रुपये पगारावर काम करत होता. हा पगार वेळेत मिळत नव्हता. मनिष गुप्ताने रजिबुल इस्लाम लष्करला थकीत पगार न देताच नोकरीवरुन काढून टाकल्याचे सांगितले. याच मुद्यावरुन दोघांच्यात वाद झाला. वाद वाढला आणि मनिष गुप्ताने चाकू हल्ला केला, असे रजिबुल इस्लाम लष्करने सांगितले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप मनिष गुप्ताला अटक केलेली नाही, असे रजिबुल इस्लाम लष्करचे म्हणणे आहे. त्याने मनिषच्या अटकेची मागणी केली आहे. मनिष गुप्ता लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने द स्टोनमॅन मर्डर्स, 420 IPC या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याने अभिनेत्री रविना टंडन, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांना घेऊन वन फ्रायडे नाईट हा चित्रपट केला होता. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या व्यतिरिक्त मनिष गुप्ता हा रामगोपाल वर्माच्या चित्रपटांसाठी स्क्रीनप्ले रायटिंग करत होता. डी आणि सरकार या दोन्ही चित्रपटांची कथा त्यानेच लिहिली होती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा