म्हाडाच्या भोगवटा प्रमाणपत्र प्राप्तीसाठी मुदतवाढ

  39

सुमारे ८० गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार


मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अभिन्यासातील पुनर्विकसित वसाहतींमधील बांधकाम केलेल्या इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफीसाठी मुंबई मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणेकरीता म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या अशा दोन्ही विशेष अभय योजनांना दि. ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. सदर विशेष अभय योजनांना मुदतवाढ मिळाल्याने सुमारे ८० गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या गृहनिर्माण संस्थांना अधिमूल्य फरकाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले आहे, त्यांना या योजनेअंतर्गत व्याज माफ करण्यात आले असून त्यांना केवळ मूळ अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा करता येणार आहे.



तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या गृहनिर्माण संस्थांकरिता म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षामार्फत विकास नियंत्रण नियमावली १९९१ अंतर्गत पुनर्विकास करण्यात आलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी दुसरी अभय योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत प्रचलित धोरणानुसार पुनर्विकसित इमारतींवर आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्काच्या रकमेवर सवलत देण्यात येत आहे. दुसऱ्या अभय योजनेअंतर्गत म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षामार्फत विकास नियंत्रण नियमावली १९९१ अंतर्गत पुनर्विकास केलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरिता ही अभय योजना लागू करण्यात आली आहे. ज्या गृहनिर्माण संस्थाना १२ नोव्हेंबर, २०१८ पर्यंत विनिनि १९९१ नुसार बांधकाम परवानगी मिळाली आहे, त्या संस्थांकरिता ही योजना लागू राहील. यामध्ये भोगवटा प्रमाणपत्र म्हाडाने दिलेल्या भूखंड क्षेत्रफळानुसार दिले जाईल. तसेच बंद फ्लॉवर बेड, बाल्कनी प्रत्येक सदनिकेमागे सूचीबद्ध करण्यात
आले आहे.


संस्थेच्या इमारतीतील अनधिकृत वापराबाबतच्या प्रचलित धोरणांनुसार आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्काच्या रकमेच्या ७५ टक्के रकमेकरिता अभय योजनेअंतर्गत सवलत देण्यात येत आहे. सदर अभय योजनांचा तपशील म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या सर्व संस्थांनी अभय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत