 
                            मुंबई : आरे वसाहतीतील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला पुन्हा तडे गेले आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याला जानेवारीत तडे गेल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा रस्त्याच्या त्याच भागात तडे पडल्याचे निदर्शनास आले आहे.
 
          शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या दानपेटीत दररोज लाखों रुपये तसेच इतर ...
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली. याअंतर्गत गेल्या वर्षी आरेमधील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण करण्यात आले होते. यातील आरे वसाहतीतील युनिट क्रमांक ५ पासून युनिट क्रमांक ६ च्या दिशेने जाणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्याला पुन्हा तडे पडले आहेत. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाही या रस्त्याचे काम करण्यात आले होते. दरम्यान, दोन वेळा काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर तडे पडतात किंवा काही भागात पुन्हा खोदकाम केले जाते. यामुळे नागरिकांमध्ये आधीच नाराजी पसरली आहे.

 
     
    




