Tuesday, September 2, 2025

Apple WWDC News: नवा आयफोन घेताय मग थांबा....  नव्या खरेदीपूर्वी हे वाचा....

Apple WWDC News: नवा आयफोन घेताय मग थांबा....  नव्या खरेदीपूर्वी हे वाचा....

मुंबई: ॲपल डब्लूडब्लूडीसी (Apple WWDC) चा कार्यक्रम ९ जूनला कॅलिफोर्निया कलिफमध्ये होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा बहुप्रतिक्षित कार्यक्रम असेल विशेषतः ॲपलचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात जगभरात आहे. याच पार्श्वभूमीवर ॲपलचा नवीन उत्पादनाबाबत या कार्यक्रमात माहिती दिली जाईल. विशेषतः नवीन येणारी आयओएस 26 (IOS 26) ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल या कार्यक्रमात माहिती दिली जाईल. कंपनीकडून आयओएस १८ नंतर थेट ॲपल कंपनी आयओएस २६ बाजारात आणणार आहे. माहितीनुसार ही प्रणाली आगळीवेगळी असणार आहे. आतापर्यंत आलेल्या सगळ्या आयओएसपेक्षा ही वेगळी असू शकते.

कंपनी आपल्या नव्या उत्पादनाबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यामुळेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली विकसित केली असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रणालीत आयओएस, आयपॅड ओएस, मॅक ओएस, वॉच ओएस यांमध्ये नवनवीन फिचर्सचा भरणा असणार आहे. या प्रणालीत आयकॉनसगट,ॲप, मेन्यू या सगळ्याच्या युजर इंटरफेसमध्ये फरक दिसून येईल. तज्ञांच्या मते २०१३ नंतर आयफोनमध्ये हा सगळ्यात मोठा बदल होईल. यात आयफोन १७ चा देखील समावेश आहे. ॲपल कंपनी त्यांच्या पुढच्या पिढीतील आयफोनमध्ये हे अपडेट्स कसे समाविष्ट करते हे पाहणे मनोरंजक असेल. कंपनी या शरद ऋतूच्या अखेरीस खूपच सडपातळ आयफोन १७ लाँच करणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.

ॲपल कंपनीच्या उत्पादनाला खूप मागणी असली तरी कंपनीच्या महसूलात २०२३ मधील तिमाहीपासून कंपनीला घसरण पहावी लागली हे देखील तितकेच वास्तव आहे. यासाठीच कंपनीने आपल्या आयओएसमध्ये आमूलाग्र बदल करून बदलत्या परिस्थितीत नवीन उत्पादन आणण्याची रणनीती आखली असेल असे म्हणायला हरकत नाही.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी आपल्या उत्पादनातील बँटरी ए आय (Battery Artificial Intelligence) मॅनेजर यामध्ये मोठा बदल करू शकते. याशिवाय ही ओएस पारदर्शक डिस्प्लेसगट येण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी आपल्या डेव्हलपरमार्फत क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून ॲप्लिकेशनचा वापर करण्यापेक्षा थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ॲप्लिकेशनचा विकास करू शकतात असे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या चाहत्यांना यावेळी वेगळीच अनुभूती येऊ शकते.

ॲपल त्यांच्या सध्याच्या गेम सेंटर ॲपची जागा घेण्यासाठी त्यांच्या डिव्हाइसेससाठी एका नवीन सेंट्रलाइज्ड गेमिंग ॲपवर काम करत असल्याचे वृत्त आहे. कंपनी त्यांच्या गेमिंग सल्ल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने काम करत आहे जेणेकरून त्यांची डिव्हाइसेस होम कन्सोल किंवा पीसीइतकीच उत्तम गेमिंग सिस्टम आहेत हे सिद्ध करता येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले.ॲपल विश्लेषक मार्क गुरमन म्हणतात की ही नाव बदलण्याची योजना कंपनीच्या इतर ऑपरेटिंग सिस्टीमना देखील लागू होईल, याचा अर्थ असा की ॲपल या वर्षी iPadOS 26, macOS 26, visionOS 26, tvOS 26 आणि watchOS 26 ची घोषणा करताना दिसू शकते.

सोलारियम नावाच्या अंतर्गत युजर इंटरफेसमध्ये रिडिझाइन प्रकल्पात टीव्ही ओएस (tvOS), वॉच ओएस (watchOS) आणि व्हिजन आयओएस (visionOS) च्या काही भागांमध्ये व्हिज्युअल ओव्हरहॉलचा समावेश असल्याचे वृत्त आहे. visionOS ही एक नवीन डिझाइन केलेली ऑपरेटिंग सिस्टम आहे जी Apple च्या लोकप्रिय नसलेल्या Vision Pro मिक्स्ड रिअलिटी हेडसेटवर पदार्पण केली गेली आहे. याशिवाय डेव्हलपरसाठी ही युजर फ्रेंडली प्रणालीचा वापर केला गेला आहे. यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये आयफोनची नवी अपडेट यूजर्सला मिळू शकते.

WWDC कार्यक्रमात होणारी अपेक्षित घोषणा -

 WWDC 2025

iOS 26

iPadOS 26

macOS 26

watchOS 26

itvOS 26

visionOS 26

९ जून ते १३ जून दरम्यान होणाऱ्या त्यांच्या डेव्हलपर कॉन्फरन्ससाठी कंपनीने आधीच वेळापत्रक जाहीर केला आहे, ज्यामध्ये ऑनलाइन आणि प्रत्यक्ष सत्रांचा समावेश असेल. कंपनीने पहिल्या दिवसासाठी एक विशेष कार्यक्रम नियोजित केला आहे, ज्यामधून ते त्यांचे मुख्य भाषण आणि प्लॅटफॉर्म स्टेट ऑफ द युनियन भाषण प्रसारित करेल.हा कार्यक्रम तुम्ही बँक ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पाहू शकता. हा कार्यक्रम ॲपल टीव्ही, ॲपल ॲप्लिकेशन, व ॲपल युट्यूब चॅनेलवर पाहू शकता. त्यामुळे तुम्ही नवीन आयफोन खरेदी करणार असाल तर आपल्या नव्या उत्पादनाबाबत माहिती घेणे फायद्याचे ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा