
महुआ यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसाममध्ये झाला. त्या आता ५० वर्षांच्या आहेत. इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या महुआ यांनी २०१० मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महुआ २०१९ मध्ये पहिल्यांदा आणि २०२४ मध्ये दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.संसदेतील तृणमूल काँग्रेसचा आवाज अशी महुआ मोईत्रा यांची ओळख सांगितली जाते. महुआ पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून सलग दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलचे नेते आहेत. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५९ रोजी झाला. ते ६५ वर्षांचे आहेत. पिनाकी मिश्रा १९९६ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रजेश किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला. पिनाकी हे सर्वोच्च न्यायालयातले वरिष्ठ वकील आहेत. त्यांची तीन दशकांची दीर्घ राजकीय आणि वकिलीतली कारकीर्द आहे. ते अनेक उच्चस्तरीय समित्यांचे सदस्य देखील राहिले आहेत.Thank you everyone for the love and good wishes!! So grateful pic.twitter.com/hbkPdE2X7z
— Mahua Moitra (@MahuaMoitra) June 5, 2025