Saturday, June 14, 2025

Stock Market Update: रेपो दराच्या निर्णयाच्या पार्श्र्वभूमीवर शेअर बाजाराचा सावध इशारा सेन्सेक्स १२१.२५ तर निफ्टीची २५.८० अंशाने घसरण

Stock Market Update: रेपो दराच्या निर्णयाच्या पार्श्र्वभूमीवर शेअर बाजाराचा सावध इशारा सेन्सेक्स १२१.२५ तर निफ्टीची २५.८० अंशाने घसरण
प्रतिनिधी: आज सकाळी रेपो दर कमी होईल का याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले होते. आता शेअर बाजारात सत्र चालू झाल्यावर गुंतवणूकदार ' वेट अँड वॉच' भूमिकेत आहेत. सकाळी ९.३० सुमारास सेन्सेक्स (Sensex) १२१.२५ अंशाने घसरत ८१३२०.७९ पातळीवर तर निफ्टी (Nifty) २५.८० अंशाने घसरत २४७२५.१० पातळीवर पोहोचला आहे. सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांक १०५.५३ अंशाने घसरत ६२६६८.०३ पातळीवर तर निफ्टी बँक निर्देशांक (Index) ४९.७० अंशाने घसरत ५५७११.२५ पातळीवर पोहोचला.

आज आरबीआयच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले असताना बँक निर्देशांक थोड्या वेळाने रिबाऊंड होईल का याचा खुलासा होईल मात्र याखेरीज फायनांशियल सर्विसेस, पीएसयु, खाजगी बँका यांच्या समभाग (Shares) चे परिणाम आज अखेरच्या टप्प्यात दिसून येतील.

बीएससी (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१५ घसरण व ०.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल तेजीत असलेले ऑटो , आयटी समभागात घसरण दिसून आली आहे. तर पीएसयु बँक समभागात मात्र ०.२५ टक्क्यांनी तेजी दिसून आली आहे मात्र खाजगी बँक समभागात ०.१५ टक्क्यांनी घसरण दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारी बँकांना खाजगी बँकाहून वाढलेला नफा पाहता हे होणे सहाजिकच होते.

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात आज सर्वाधिक वाढ रामकृष्ण फोर्ज (६.२४%), कोचीन शिपयार्ड (५.९%), झेडएफ कर्मशिअल (४.०२%), हिंदुस्थान झिंक (२.०४%), इंडसइंड बँक (०.८४%), इटर्नल (०.७२%), पॉवर ग्रीड (०.४२%), एनटीपीसी (०.४१%), अदानी पोर्टस (०.३३%), एचयुएल (०.२१%), कोटक महिंद्रा (०.१३%) या समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एमएमटीसी (२.९१%), बँक ऑफ बडोदा (२.५५%), टाटा स्टील (२.११%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.८३%), बजाज फिनसर्व्ह (०.७२%), ट्रेंट (०.६८%), अपोलो हॉस्पिटल (०.६७%), आयसीआयसीआय बँक (०.५९%), एचसीएलटेक (०.५२%), भारती एअरटेल (०.४३%) या समभागात झाली आहे.
Comments
Add Comment