Sunday, June 8, 2025

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: रेपो दराचा बाजारात बोलबाला सेन्सेक्स ७४६ व निफ्टी २५२ अंशाने वधारला

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: रेपो दराचा बाजारात बोलबाला सेन्सेक्स ७४६ व निफ्टी २५२ अंशाने वधारला

मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर दणदणीत झाली आहे. बाजार गिफ्ट निफ्टीच्या संकेतानंतर रूक्ष होईल का ही चिंता गुंतवणूकदारांना होती. मात्र १० वाजल्यानंतर विशेषतः आरबीआयच्या रेपो दरात कपात झाल्यानंतर बाजाराने उसळी घेतली. जी अखेरच्या सत्रातील टप्प्यापर्यंत कायम राहिली आहे. सत्र संपताना सेन्सेक्स (Sensex) थेट ७४६.९५ अंशाने वाढत ८२१८८.९९ व निफ्टीने २५२.१५ अंशाने वाढत २५००३.०५ पातळी गाठली आहे. अजून २५१०० पातळी बाजाराला गाठणे शक्य झाले नाही तरी आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता भारतीय अर्थव्यवस्थेने एक दर्जा प्रस्थापित केला आहे. आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आपल्या निवेदनात भारतीय बाजार स्थिर व प्रगतीशील असल्याचे सुतोवाच केले होते.


सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ७८२.८० अंशाने (१.२५%) व निफ्टी ५० हा २५२.१ अंशाने (१.०२%) वाढला आहे. यामुळेच आज बाजारातील बँक समभाग (Shares) मध्ये मोठी उलाढाल शक्य झाली आहे. यापूर्वी सरकारी पीएसयु बँकेने खाजगी बँकेच्या तुलनेत तिमाहीत अधिक नफा कमावला होता. त्याचा परतावाही गुंतवणूकदारांना गेल्या आठवड्यात मिळाला होता. मात्र आश्चर्यकारकरीत्या आज खाजगी बँकांच्या निर्देशांकात पीएसयु निर्देशांकात अधिक वाढ झाली आहे. निफ्टी पीएसयुमध्ये ०.५८ टक्के व खाजगी बँक निर्देशांकात १.७९ टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीत क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices )चा विचार केल्यास रियल्टी (४.६८%), फायनांशियल सर्विसेस (२.०९%), मेटल (१.९०%) समभागात वाढ झाली आहे. आज भारतीय वीआयएक्स निर्देशांक (VIX India) निर्देशांक -३ टक्के गेल्याने बाजारात स्थिरतेचा संदेश दिला गेला आहे. ९५ समभागांनी आज ५२ आठवड्यातील उच्चांक (52 Week High) गाठला आहे.


आज अमेरिकेन गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली होती तसेच रुपयांच्या तुलनेत डॉलर घसरल्याने त्याचा फायदा बाजारात झाला आहे. रेपो दर कपातीचा परिणाम आज रूपयांवर झाल्याने रूपया ८५.६२ पातळीवर राहिला आहे. सोन्याची किंमत 'जैसे थे' राहिली. जागतिक पातळीवर डब्लूटीआय (WTI) व ब्रेंट (Brent) क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत अनुक्रमे ०.०९ % व ०.१५% ने वाढ झाली आहे. यामुळेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्याने बाजाराला त्याचा एकप्रकारे फायदाच झाला आहे. आज क्षेत्रीय निर्देशांकात मिडियाचा अपवाद वगळता इतर समभागात वाढ झाली.


आज शेअर बाजारात सर्वाधिक वाढ गोदरेज इंडस्ट्रीज (१४.५६%), ए बी रिअल इस्टेट (९.०४%), रामकृष्ण फोर्ज (९.२६%), चोला फायनांशियल (८.४८%), मूथुट फायनान्स (७.३५%), आयडीएफसी फर्स्ट बँक (७.०७%), आयसीआयसीआय लोमबार्ड (६.९९%), गोदरेज प्रॉपर्टी (६.७५%), डीएलएफ (६.६२%), बजाज होर्डिंग्ज (५.७०%), एक्सिस बँक (३.०७%) या समभागात गुंतवणूकदारांना आकर्षक फायदा झाला आहे. तर ज्योती सीएनसी (५.३३%), गार्डन रिच (४.६९%), जिलेट इंडिया (४.०२%), सीजी पॉवर (२.१४%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.६२%), हिताची एनर्जी (६.७२%), बँक ऑफ बडोदा (१.७८%) या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.


आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना शेअर बाजाराचे ज्येष्ठ अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'मागच्याच  आठवड्यात  जागतिक बॅकेने भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आली असल्याबद्दल सुचीत केले होते.त्यानंतर आलेले चौथ्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे आपली अर्थव्यवस्था निश्चितपणे जलद आहे ती पुनः एकदा मुसंडी मारायला तयार आहे. हे सर्व  आकडे आपणास दाखवत होतेच. पण नुकतेच झालेले युद्ध  भारताला खूप मोठी आर्थिक ताकद देऊन गेलेले दिसत आहे.असे चित्र जागतिक पातळीवर क्वचित पहायला मिळाले.हे खरं भारताचे यश आहे. तीन दिवसाच्या युद्धात भारताची ''डिफेन्स' तयारी जगाने पाहीली. व भारताने स्वदेशी डिफेन्स उत्पादनांचा लाईव्ह डेमो जगाला दाखवला.भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे खुपच चांगले परिणाम कसे साध्य करता येतील याची तयारी आज माॅनेटरी  पाॅलिसी मधे झलक पहायला मिळाली.अर्धा टक्का दरकपात आणि बॅकिंग व अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सीआरआर गुणोत्तर मधील कपात होय. बॅंका व इतर आर्थिक संस्थांमार्फत तरलता (लिक्विडिटी),व पतपुरवठा सुरळीत राहील ही दक्षता आज आरबीआई ने विशेषतः घेतलेली दिसत आहे.


अर्थातच त्याचे शेअरबाजारात स्वागत होतेच. पण एका युद्धांनंतर भारताची आर्थिक क्रेडिट रेटिंग करणारी जागतीक कीर्तीची एजन्सी "मार्निग स्टार " ने भारताचे रेटिंग वाढविले  आहे. हा सर्व घटनाक्रम पहाता भारताची आर्थिक प्रगती ही पुढील काळासाठी  फारच चांगली असेल हे निश्चित.आज बाजारात या सर्वाचा सकारात्मक प्रतिसाद दिसला.बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस  बॅक,मारूती,महिन्द्रा या मुळेच  बाजार पाॅझिटीव  बंद झाला.'


आशिका इन्स्टीट्यूशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवत म्हणाले, 'निफ्टी २४,७४८ वर स्थिर स्थितीत उघडला आणि दिवसाच्या अंतर्गत निचांक २४,६७१ वर घसरला. तथापि, आरबीआय गव्हर्नर यांनी त्यांचे धोरणात्मक भाषण सुरू करताच, निर्देशांकात सुधारणा झाली आणि तो २५,०२९ च्या उच्चांकावर पोहोचला. सत्र अस्थिर राहिले, दिवसभर बँकिंग समभागांनी केंद्रस्थानी राहिले. क्षेत्रनिहाय रिअल्टी,वित्तीय सेवा,बँकिंग,ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये जोरदार खरेदीचा उत्साह दिसून आला, बहुतेक क्षेत्रे हिरव्या रंगात संपली. रिझर्व्ह बँकेने बेंचमार्क रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची कपात करण्याची घोषणा केल्यानंतर बाजार तेजीत आले आणि तो ५.५% पर्यंत खाली आला. मध्यवर्ती बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) देखील १०० बेसिस पॉइंटने कमी करून ३% वर आणला. या अनुकूल उपाययोजना असूनही, आरबीआयने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज ६.५% वर कायम ठेवला.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, ' भारतीय शेअर बाजाराच्या बेंचमार्क्सची सुरुवात मंदावली होती परंतु आरबीआयच्या चलनविषयक धोरण घोषणेनंतर दिवसाच्या उच्चांकी पातळीजवळ संपली. मध्यवर्ती बँकेने एक धक्कादायक आश्चर्य व्यक्त केले, रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% केला, तसेच कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये १०० बेसिस पॉइंट्सची कपात केली, तर 'तटस्थ' धोरणात्मक भूमिका घेतली. यामुळे चलनवाढीचा दबाव आणि जागतिक मॅक्रो अनिश्चितता यांच्यात वाढ वाढवण्याच्या उद्देशाने आरबीआयचा अनुकूल दृष्टिकोन अधोरेखित झाला. निफ्टी ५० निर्देशांकाने सुरुवात सपाट केली परंतु धोरणानंतर तो वाढला, सत्राच्या शिखर २५,००३ च्या जवळ बंद झाला, ज्यामध्ये २५२ अंक किंवा १.०२% वाढ झाली. बाजारातील अस्थिरता कमी झाली, इंडिया VIX मध्ये २% पेक्षा जास्त घट झाली, ज्यामुळे संरक्षणात्मक हेजेजची मागणी कमी झाली आणि गुंतवणूकदारांच्या जोखीम क्षमतेत वाढ दिसून आली. व्यापक बाजारपेठेने चांगली कामगिरी केली, निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १.२% आणि ०.८% ने वाढले. क्षेत्रीय आघाडीवर, मीडिया (१% घसरण) वगळता, सर्व प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. रिअल्टी समभागांनी ४% च्या जोरदार वाढीसह तेजीचे नेतृत्व केले, तर मेटल, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्सने प्रत्येकी १% पेक्षा जास्त वाढ नोंदवली,ज्याला सुधारित भावना आणि धोरणात्मक टेलविंड्सचा पाठिंबा होता.'


निफ्टीबद्दल भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'गेल्या तीन आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या बँडवरून अपेक्षित रेषांवर खरेदीची मागणी उदयास आल्यामुळे निफ्टीने आठवड्याच्या चार्टमध्ये तेजीची मेणबत्ती तयार केली आहे. निफ्टी सध्या गेल्या तीन आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या २४,४००-२५,१०० च्या वरच्या बँडवर आहे.आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक श्रेणीच्या वरच्या बँडच्या वर जाईल आणि येत्या आठवड्यात २५,२५० च्या तात्काळ अडथळाकडे आणि नंतर २५,५०० च्या दिशेने जाईल. येत्या आठवड्यात घसरण खरेदीची संधी म्हणून वापरली पाहिजे कारण २४,७०० आणि २४,४०० पातळींवर असलेला मुख्य अल्पकालीन आधार मागील ब्रेकआउट क्षेत्र आहे. गेल्या तीन आठवड्यांचा नीचांक आणि प्रमुख रिट्रेसमेंट क्षेत्राचा संगम आहे.'


बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'गेल्या ६ आठवड्यांच्या रेंजच्या वरच्या बँडच्या वर ब्रेकआउट निर्माण झाल्यामुळे साप्ताहिक चार्टमध्ये निर्देशांकाने एक मजबूत बुल कॅन्डल तयार केली आहे, जो अलिकडच्या एकत्रीकरणानंतर पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे संकेत देतो. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक सकारात्मक पूर्वाग्रह राखेल आणि नजीकच्या काळात ५६,७०० आणि ५७,२०० पातळींकडे जाईल. अल्पकालीन रचना रचनात्मक राहते कारण शुक्रवारचा ब्रेकआउट क्षेत्र ५५,९०० पातळींवर तात्काळ आधार ठेवला आहे. तर प्रमुख आधार ५५,२०० पातळींवर आहे जो २० दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट क्षेत्राचा संगम आहे.


आज एकूणच बाजाराचे वर्णन करायला गेल्यास उत्तम असे म्हणावे लागले मात्र त्याला अपवाद मिडिया क्षेत्रीय समभाग ठरले आहेत. उत्साही वातावरण असूनही, निवडक कंपन्यांमध्ये नफा बुकिंग दिसून आली. संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर दबाव आला, सोलर इंडस्ट्रीज आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स अनुक्रमे ३% आणि जवळपास २% घसरले आहेत. याशिवाय २० कंपन्यांनी आपला लाभांश जाहीर केल्यानंतरही त्या समभागाची स्थिती संमिश्र राहिली आहे.आज उल्लेखनीय बाब म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE) ची एक संस्था असलेल्या एनएसई सस्टेनेबिलिटी रेटिंग्ज अँड एनालिटिक्स लिमिटेडने शुक्रवारी सूचीबद्ध कंपन्यांसाठी त्यांचे ईएसजी रेटिंग लाँच करण्याची घोषणा केली. ही फर्म पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी ESG) कामगिरीचे मूल्यांकन करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे आणि भागधारकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची माहिती देण्यासाठी ही संस्था मोलाची कामगिरी करेल. पर्यावरणाच्या दृष्टीने हे शेअर बाजाराचे हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment