बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार शनिवार ७ जून २०२५ नंतर जग दोन गटात विभागले जाईल. महाविनाश होईल. जगातील एक गट तंत्रज्ञान आणि भौतिक सुखांचा पाठलाग करताना स्वतःचे नुकसान करुन घेईल तर दुसरा गट अध्यात्म, व्यवहार ज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिक सुख यात समतोल साधून प्रगती करेल. दोन्ही गटांमध्ये शनिवार ७ जून २०२५ नंतर लवकरच संघर्ष होणार आहे. हा संघर्ष आणि त्यामुळे होणारा विनाश हा अटळ आहे.
हवा आणि पाणी विषारी होईल. मोठ्या दुर्घटना होतील. ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतील. अनेक देशांचे एकमेकांशी संघर्ष होतील. दक्षिण गोलार्धात जमिनीखालून धूर येऊ लागेल आणि अनेकांची चिंता वाढेल. चुंबकीय लाटा गंभीर समस्या निर्माण करतील. वेगवेगळे घातक आजार पसरतील, असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार ७ जून २०२५ रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ ग्रह हा अशुभाचा संकेत समजला जातो. यामुळेच मंगळ ग्रहाचे शनिवार ७ जून रजी होणार असलेले ग्रह परिवर्तवन ही मोठ्या संकटाची चाहुल असल्याचे भाकीत बाबा वेंगा यांनी केल्याची बातमी व्हायरल होत आहे.
बल्गेरियातील गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा यालाच बाबा वेंगा म्हणायचे. लहानपणापासूनच अंध असलेल्या या व्यक्तीने केलेली अनेक भाकीते गाजली. बाबा वेंगा हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध झाला. आता बाबा वेंगाने केलेले ७ जून नंतर विनाश अटळ हे भाकीत व्हायरल होत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. अण्वस्त्रांवरुन अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. पण अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. इस्रायल हमास ही अतिरेकी संघटना संपवण्यासाठी सशस्त्र कारवाई करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे.
अस्वीकरण : ही इंटरनेटवरुन संकलित केलेली माहिती आहे. या माहितीची पुष्टी प्रहार करत नाही.