Saturday, June 14, 2025

तिकीट तपासणी मोहिमेतून पश्चिम रेल्वेने वसूल केले ४३ कोटी दंड वसुली

तिकीट तपासणी मोहिमेतून पश्चिम रेल्वेने वसूल केले ४३ कोटी दंड वसुली

मुंबई: मुंबई उपनगरीय लोकल, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून कसून तिकीट तपासणी मोहिम राबविली. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी पथकांनी एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमेत ४३.५४ कोटी रुपये वसूल केले. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील ११.७१ कोटी रुपयांचाही समावेश आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, मे २०२५ दरम्यान ३.०२ लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून २१.६५ कोटी रुपये वसूल करण्यात आले, ज्यामध्ये न बुक केलेल्या सामानाची प्रकरणे देखील समाविष्ट आहेत. तसेच, मे २०२५ मध्ये, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १.०४ लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली आणि ५.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील नियमितपणे राबवल्या जात आहेत. या मोहिमांच्या परिणामी, एप्रिल ते मे २०२५ पर्यंत १०३०० हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड करण्यात आला आणि सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे पश्चिम रेल्वे सर्वसामान्यांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment