अभिनेता प्रथमेश परबच्या 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या 'गाडी नंबर १७६०' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


गाडी नंबर १७६० या चित्रपटाचा टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना दिसतेय. सुरुवातीलाच दाखवलेली पैशांनी भरलेली बॅग अचानक गायब होते आणि तिथून रहस्याने भरलेला आणि विनोदाने सजलेला प्रवास सुरू होतो. या चित्रपटात बॅगेच्या शोधात अनेक जण एकमेकांवर संशय घेताना, गोंधळात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे रहस्य वाढतेय तर दुसरीकडे संवाद आणि प्रसंगांमधून विनोद प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. ही बॅग नेमकी कुठे गेली? हे चित्रपटगृहात पाहायला मिळेल. हा चित्रपट येत्या ४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 


'गाडी नंबर १७६०' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यात प्रथमेश परब , शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारखे उत्तम कलाकार आहेत. प्रत्येक पात्राची एक गूढ बाजू आहे आणि ती पडद्यावर उलगडताना या कलाकारांचा अभिनय चित्रपटाला अधिकच मनोरंजक बनवतो. या चित्रपटात विनोद, रहस्य, मिस्ट्री, ड्रामा सर्वकाही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'गाडी नंबर १७६०' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाचे निर्मिती कैलाश सोराडी आणि विमला सोराडी यांनी केली आहे.

Comments
Add Comment

पैशाचं सोंग कमी पडलं...!

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आम्हा नाट्यनिरीक्षकांना सालाबादप्रमाणे यंदाही मागील वर्ष नाट्यसृष्टीस कसं गेलं? याचा

निर्मितीवस्था आणि पंचनायिका...!

राज चिंचणकर, राजरंग रंगभूमीवर नाटक सादर होत असताना, रंगमंचाच्या मागे दुसरे नाट्य घडत असते आणि त्या नाट्याचा

हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा'

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण

अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात ..त्या निर्णयामुळे शाहरुख खान अडचणीत ?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे.मात्र,आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला.हेच नाही तर