मुंबईतील पावसाळ्यापूर्व नाल्याच्या सफाईचे काम ८२ टक्के पूर्ण

  47

मोठ्या नाल्यातील सफाईचे काम १०५ टक्के;


एआय प्रणालीमुळे कंत्राटदारांना आतापर्यंत ३ कोटींचा दंड


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील मिठी नदीसह मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे असून दरवर्षी वार्षिक उदिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के गाळ उपसा केला जातो. त्यापैकी या वर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ६८ हजार ००८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टानुरुप, आतापर्यंत ७ लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन म्हणजे निधारित उहिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मोठ्या नाल्यांमधून पावसाळापूर्व सफाई ही आतापर्यंत १०५.८१ टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. या नालेसफाईचा अभ्यास करुन गाळ उपशाचे दरवर्षांचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. तसेच पावसाळा दरम्यान १० टक्के, तर उर्वरित कालावधीत १० टक्के गाळ उपसा केला जातो.

मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. त्यानुसार, ४ जून २०२५ सकाळपर्यंत ७ लाख ९६ हजार ७६४ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित वद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात गाळ काढण्याची कामांना सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी मुंबईत ६ मे २०२५ पासून पावसाला सुरूवात झाली. एवढेच नव्हे तर, में २०२५ मध्ये पहिल्यांदाच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचे आगमन वेळेपूर्वी झाल्याचा अंशतः परिणाम नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर झाला, तरीही, जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रमुख नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत नदी स्वच्छता आणि वहन क्षमतेत वाढ करण्यास विशेष महत्त्व दिले जात आहे. नदीतून गाळ काढण्याची कार्यवाही अधिक वेगाने करण्यासाठी विविध भागांमध्ये समर्पित पथके आणि मंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. बंदा या नालेसफाईच्या कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए, आय. प्रणालीचा वापर केला जात आहे. या माध्यमातून साधारणतः ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी कंत्राटदारांकडून करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. पावसाळा व पावसाळ्यानंतरही गाळ उपशाची कामे सुरु राहणार आहेत.

अशाप्रकारे झाली नालेसफाई


मोठ्या नाल्यांमधून पावसाळापूर्व ३ लाख ५७हजार ४३० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत ३ लाख ७८ हजार २१४ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण १०५.८१ टक्के आहे.

लहान नाल्यातून पावसाळापूर्व ३ लाख ९६ हजार २६२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत २ लाख ८६ हजार ००४ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ७२.१८ टक्के आहे. हे काम १०० टक्के पूर्ण होईपर्यंत सुरु राहील.

मिठी नदीतून पावसाळापूर्व २ लाख १४ हजार ३१५ मेट्रिक टन गाळ काढण्यापे उद्दिष्ट आहे. पैकी, आतापर्यंत १ लाख ३२ हजार ५४५ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६१.८५ टक्के आहे. अडचणींमुळे हे काम मागे पडले असले, तरीदेखील अतिरिक्त संसाधनांचा वापर करुन हे काम पूर्ण केले जाणार आहे.
Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी