डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, या १२ देशाच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी इराण, अफगाणिस्तानसह जगातील १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्याची बंदी घातली आह. त्यांनी बुधवारी याची घोषणा केली. अमेरिकन राष्ट्रपतींनी नुकतेच यांसंबंधीत घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. यात म्हटले आहे की, दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून सुरक्षेसाठी हे पाऊल अतिशय गरजेचे आहे.


ट्रम्प यांनी ज्या देशातील नागरिकांवर बंदी घातली त्यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लीबिया, सोमालिया, सूडान आणि यमन या देशांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी पुढे म्हटले की या देशांशिवाय इतर सात देश बुरूंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर आंशिक बंदी घालण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हे आदेश ९ जून २०२५ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. आदेशामध्ये हे ही सांगितले आहे की या तारखेच्या आधी जारी केलेले व्हिसा रद्द केले जाणार नाहीत. ट्रम्प यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले की या देशांच्या यादीत आणखीही नावे जोडली जाऊ शकrतात. जे लोक आम्हाला नुकसान पोहोचवू शकतात अशा लोकांना आम्ही देशात घुसू देणार नाही असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.



बंदी घालण्यात आलेले देश


अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कांगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लीबिया, सोमालिया, सूडान आणि यमन
Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प