CSR News: गोदरेज ग्रुप, बीएमसी आणि भामला फाउंडेशनकडून प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धच्या जागरूकतेचे कृतीत रूपांतर

मुंबई: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप (GIG) ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि भामला फाउंडेशन यांच्या सहकार्याने #BeatPlasticPollution मोहीम सुरू केली आहे, ज्याला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (UNEP) पाठबळ मिळाले आहे. हा उपक्रम प्लास्टिक प्रदूषण आणि पृथ्वीवरील संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी, जीवन टिकवून ठेवण्यासाठी,माती,वनस्पती आणि पर्यावरण संरक्षणाची व्यापक गरज यासह अनेक गंभीर पर्यावरणीय आव्हानांवर तोडगा काढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांनी संस्थेच्या शाश्वततेसाठी वचनबद्धता आणि सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, "लोकांना आणि ग्रहाला प्राधान्य देणे याचा आमच्या मूलभूत मूल्यांमध्ये अंतर्भाव होतो. गेल्या दशकात, आम्ही शाश्वततेच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे - आमची ६४% ऊर्जा आता अक्षय्य स्रोतांमधून येते आणि आम्ही आमची प्लास्टिक पॅकेजिंग तीव्रता २०% पेक्षा अधिक कमी केली आहे. आम्ही उत्पादित केलेल्या आधी आणि नंतरच्या प्लास्टिक पॅकेजिंगपैकी १००% पॅकेजिंग हे पुनर्वापरातून होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.


आमच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांद्वारे, आम्ही ६३००० मेट्रिक टन पेक्षा जास्त कचरा क्षेपण भूमीतून वळवला आहे, जमीन मोकळी केली आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय परिणाम कमी केला आहे. ही मोहीम अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल घडवून आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा एक नैसर्गिक विस्तार आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि अक्षय्य ऊर्जा यासारख्या गंभीर आव्हानांना तोंड देऊन, आम्ही सामूहिक कृतीला प्रेरणा देण्याचे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत वारसा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”


प्लास्टिक कचरा हा भारतासाठी एक गंभीर चिंतेचा विषय आहे. २०२३ मध्ये ९.४६ दशलक्ष टन प्लास्टिक निर्माण झाले, त्यापैकी जवळजवळ ४३% प्लास्टिकचा पुनर्वापर शक्य नाही. या आव्हानाला तोंड देण्यासाठी, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि या ग्रहावरील साधन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत जीवनशैली पर्यायांचा अवलंब करण्याच्या महत्त्वावर भर देते.


या हेतूला पाठबळ देत, मुंबईतील वांद्रे परिसरात गोदरेज मॅजिक रेडी-टू-मिक्स हँडवॉश स्टेशनचे अनावरण करण्यात आले. एका आठवड्याहून अधिक काळ चालू राहिलेल्या या उपक्रमाने लोकांना हँडवॉश स्टेशनवर बाटल्या पुन्हा भरून त्या वापरण्यास प्रोत्साहन दिले. गोदरेज मॅजिक हँडवॉश स्टेशनमध्ये रिअल-टाइम डॅशबोर्ड आहे जो अशाप्रकारे रिफिल केल्याने वर्षभरात किती प्लास्टिक वाचवता येते हे दर्शवितो - वैयक्तिक आवडी निवडींचे सामूहिक परिणामात रूपांतर करतो.


गोदरेज मॅजिक हँडवॉश उपक्रमाबद्दल गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चे मार्केटिंग हेड - पर्सनल केअर नीरज सेनगुट्टुवन म्हणाले, “भारतातील प्लास्टिक कचऱ्याचे संकट वाढत आहे, दरवर्षी लाखो टन कचरा निर्माण होतो आणि एकदा वापरता येणारे, पुनर्वापर न होऊ शकणारे प्लास्टिक पर्यावरणीय शाश्वततेसाठी सर्वात मोठा धोका निर्माण करत आहे. जीसीपीएलमध्ये, आम्ही कायम शाश्वततेला प्राधान्य देतो. व्यवसाय, पर्यावरणीय तसेच सामाजिक जबाबदारीचे संतुलन साधतो. गोदरेज मॅजिक हँडवॉश हा एक असाच एक शाश्वत नवोन्मेष आहे जो नियमित हँडवॉशच्या तुलनेत ५०% कमी प्लास्टिक, ७५% कमी इंधन आणि ७५% कमी कागद वापरतो. बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासारख्या लहान, जाणीवपूर्वक कृती कशा अर्थपूर्ण, जाणवणारे बदल घडवू शकतात, याचे ही मोहीम हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक रिफिल म्हणजे लँडफिलमध्ये एक बाटली कमी करणे. या उपक्रमाच्या परिणामांचा रिअल टाइममध्ये विचार करून आम्ही जागरूकतेचे कृतीत रूपांतर करत आहोत.”


गोदरेज ला'अफेअरने देखील या मोहिमेला पाठिंबा दिला आहे, ज्याचा समारोप आज एका सायक्लोथॉनने होईल. यात शाश्वततेसाठी आपली वचनबद्धता दाखवण्यासाठी आणि पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी जागतिक आवाहनाला बळकटी देण्यासाठी सहभागींना आमंत्रित केले जाईल.

Comments
Add Comment

Sara Tendulkar : प्रेक्षकांचे वेधले लक्ष; सारा तेंडुलकरचा स्पेन मधील ग्लॅमरस लुक

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत

Maha Rojgar Melava : पनवेलमध्ये ‘महारोजगारमेळावा २०२६’ला हजारोंचाउत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचासहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ

पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या हजारो युवक-युवतींसाठी पनवेलमध्ये

Nashik News : विशेष महासभेत सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत नाशिकचे रस्ते, त्यातील खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले अपघात चर्चेच्या

प्लास्टिकमुळे कॅन्सर; पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटली सुरक्षित आहे का ?

प्लॅस्टिक आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु संशोधनातून असे समोर आले आहे की

Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अर्जुन रणतुंगानी तब्बल ७२ किलो वजन कसे कमी केले ? श्रीलंकेचे माजी क्रिकेट कर्णधार अर्

Jalgaon Airport : जळगाव विमानतळ विस्ताराला वेग ! जमीन मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. विमानतळ