Tuesday, December 30, 2025

माथेरानला जायचा विचार करत आहात का? तर आधी हे वाचा...

माथेरानला जायचा विचार करत आहात का? तर आधी हे वाचा...

नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद

माथेरान : नेरळ माथेरान टॉय ट्रेन मान्सून पूर्व बंद करण्यात आली आहे. नेरळ येथील तिकीट विक्री खिडकी बाहेर दिनांक ३० मे रोजी तशी माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. तसेच अमन लॉज ते माथेरान शटल सेवा ही चालू राहणार आहे. माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावरील शटल ट्रेन सेवा पावसात देखिल सुरु रहाणार असून या शटल ट्रेनला आणखी २ प्रवाशी वर्गाचे डबे जोडण्यात यावेत व दोन ऐवजी एकच सामान वाहतूक बोगी लावून सोमवार ते शुक्रवार दर दिवशी ८+८ आणि शनिवार, रविवारी दिवशी १०+१० शटल ट्रेन चालविण्यात याव्यात अशी पर्यटकांची मागणी आहे.
Comments
Add Comment