
सावंतवाडी : एकीकडे धरणावर फिरायला गेलेला १९ वर्षांचा युवक सेल्फी घेताना पाण्यात बुडाला. तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी दुहेरी शोकांतिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे-पेडवेवाडी येथे घडली.
क्रिश सावियो संभया (वय १९) हा युवक आपल्या मित्रांसोबत मंगळवारी धरणावर गेला होता. सेल्फी घेताना तोल जाऊन तो धरणाच्या पाण्यात पडला. मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री ११ वाजता क्रिशचा मृतदेह पाण्यावर आढळून आला.

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी माणसांची तारांबळ उडाली तसेच प्राण्यांची ...
मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडील सावियो आग्नेल संभया (वय ४८) यांना तीव्र मानसिक धक्का बसला. मंगळवारपासूनच ते धक्क्यात होते. बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले.
एका दिवसात मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने संभया कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. क्रिश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आणि पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता. पण नियतीने त्याचे स्वप्न अधुरेच ठेवले.
ही घटना संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे."एका सेल्फीने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं", अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.