दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढण्याची गरज

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया संसदेत सडेतोड भाषण


लायबेरिया: दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार


डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत. सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून आणि उपसभापती थॉमस पी. फल्लाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. सिनेटचे अध्यक्ष न्यूब्ली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉ. शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) अर्थसहाय्य मिळत आहे.


भारताने पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी केल्याचे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लायबेरियाच्या कठिण काळात भारताने नेहमीच सोबत केली. दोन्ही देशांचे खास संबंध आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने सोमवारी लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री साराह बेस्लो न्यान्ती यांच्याशी चर्चा केली.


भारताच्या दहशतवाद विरोधी मोहीमाला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो-टेम्पोर अध्यक्ष न्योनब्ली करंगा-लॉरेन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Comments
Add Comment

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट

भायखळा-सायन स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी ब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.