Friday, June 6, 2025

संजय शिरसाटांचं ठाकरेंना थेट चॅलेंज : चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा!

संजय शिरसाटांचं ठाकरेंना थेट चॅलेंज : चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा!

सांगली : मुंबई, कोकणनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवलेले आणि डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. हा प्रवेश संपन्न होणारच, असा विश्वास शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. हिम्मत असेल तर हा प्रवेश थांबवून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी ठाकरेंना दिले आहे.



काय आहे प्रकरण?


सांगलीतून लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने तिकिट दिलं होतं. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारत आघाडीतच बंड पुकारलं. याच तिरंगी लढतीत विशाल पाटील विजयी ठरले, तर चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले.



‘ज्यांच्यासाठी वितुष्ट घेतलं, तेच आता सोडून जात आहेत!’


चंद्रहार पाटील यांच्यासाठी खासदार संजय राऊत यांनी आग्रही भूमिका घेतली होती, आणि याच निवडीमुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं. पण आता तेच चंद्रहार पाटील पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत.



सोमवारी शिंदे गटात प्रवेश निश्चित!


९ जून रोजी चंद्रहार पाटील शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत. याआधी त्यांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली होती, तर मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने चर्चाही पार पडली होती. जरी त्यांनी तेव्हा “मी पक्षातच आहे” असं म्हटलं होतं, तरी त्यांच्या हालचाली वेगळंच काहीतरी सुचवत होत्या.पण एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लढणारे नेते आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

Comments
Add Comment