Saturday, October 25, 2025
Happy Diwali

'या' दिवसापासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २१ जुलै ते मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनातील कामकाजाची सुरुवात सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. पर्यटकांना ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानला दणका दिला होता. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने निवडक देशांमध्ये राजकीय शिष्टमंडळे पाठवून देशाची दहशतवाद विरोधी भूमिका जाहीररित्या मांडली होती. शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील अनेक नेते सहभागी करुन घेतले होते. या सर्वच शिष्टमंडळांनी भारताची बाजू प्रभावीरित्या जगापुढे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >