Sunday, October 26, 2025
Happy Diwali

'या' अभिनेत्रीने गुपचुप उरकले आपले लग्न, फोटो शेअर करत दिला चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

'या' अभिनेत्रीने गुपचुप उरकले आपले लग्न, फोटो शेअर करत दिला चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नबंधनात अडकली हिना खान, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Hina Khan ties the knot with boyfriend Rocky Jaiswal: हिंदी टीव्ही अभिनेत्री हिना खानला कोण नाही ओळखत? तिचे देशभरात लाखों चाहते असून, हिना खानबाबत प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असलेल्या या अभिनेत्रीच्या आरोग्याचा पाठपुरावा देखील तिचे चाहते करताना दिसतात. मात्र या दरम्यान, हिनाने तिच्या चाहत्यांना एक मोठा धक्काच दिला आहे. हिनाने तीचा बऱ्याच काळापासूनचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत गुपचुप विवाह केला, ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हिनाने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये,  वधूच्या वेशात ती खूपच गोंडस दिसून आली.  फोटोमध्ये, हिना खान साध्या पेस्टल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती, तर रॉकीने पांढऱ्या शेरवानी परिधान केली होती.

पहा हिना खानच्या लग्नातले न पाहिलेले फोटो

हिना खान हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या डेली सोपमध्ये अक्षरा म्हणून वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यांनंतर ती हिंदी बिग बॉसच्या 11 व्या सीजनची विजेती ठरली आहे. मात्र त्यांनंतर गेल्या काही काळापासून ती खूप कठीण काळातून जात आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या वडिलांना गमावल्यानंतर, हिनाला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोगाचे निदान झाले, ज्यासाठी ती बराच काळ उपचार घेत आहे. या काळात तिने सोशल मीडियाद्वारे कर्करोगाच्या लढाईत ती पूर्ण धैर्याने कशी लढली याबद्दल अपडेट देत राहिली. या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालनेही प्रत्येक क्षणी तिची काळजी घेतली होती.

हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांनी केले रजिस्टर मॅरेज

हिना अनेक वर्ष रॉकीसोबत रिलेशनशिप मध्ये असून, कर्करोगाच्या उपचारादरम्यान या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. ज्याची माहिती हिनाने फोटोद्वारे दिली. हिना खानच्या लग्नाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद तर झाला , पण त्याच वेळी त्यांना खूप धक्का देखील बसला आहे, कारण याबद्दलची कल्पना कुणालाच नव्हती.

प्रेम आणि कायदेशीर मार्गांनी एकत्र - हिना खान

लग्नाच्या फोटोंची ही मालिका शेअर करताना हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, "दोन वेगवेगळ्या जगातील लोकांनी प्रेमाने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले. आमचे मतभेद मिटले आणि आमची मन जुळली गेली. आम्ही आयुष्यभरातल्या बंधनात आता बांधले गेलो आहोत. आता आम्ही आमचे घर आहोत, एकमेकांचा प्रकाश आणि आशा आहोत. आम्ही सर्व अडथळे पार केले आहेत. आम्ही कायदेशीर मार्गांनी एकमेकांच्या प्रेमात बंदिस्त झालो आहोत.  आता पती-पत्नी म्हणून तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत". हिना खानच्या या पोस्टवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करण्यापासून मागे हटले नाहीत. एका युजर्सने लिहिले की, "तुम्ही दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे". अभिनेत्री सोफी चौधरीने लिहिले की, "खूप सुंदर बातमी आहे ही हिना, देव तुम्हाला जगातील सर्व आनंद देवो". बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणते, "आता आयुष्यभर तुमच्यासोबत आनंद राहणार आहे" . याशिवाय रोहन मेहरा, किश्वर मर्चंट, आमिर अली, सुरभी ज्योती सारख्या स्टार्सनी देखील हिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >