
पाकची धमकी, भारताकडून वाटाण्याच्या अक्षता
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं तरी पाण्यावरून सुरू झालेलं युद्ध अधिक तीव्र झालंय. भारताने १९६०च्या सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आणि पाकिस्तानात खळबळ उडाली. दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर बंदी घालण्याची भीती दाखवलीय. मात्र पाकिस्तानचे हे कारनामे खोटे असल्याचे भारताचे म्हणणे आहे. युद्धविरामानंतरही भारत - पाकिस्तान यांच्यात नेमकं काय सुरू आहे. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं, तर सतलज, बियास आणि रावी नद्यांचा पाण्याचा वापर भारत करतो, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर आणि पाणीपुरवठ्यावर होणार आहे. भारत - पाकिस्तानमधील जलविवाद टाळण्यासाठी सिंधू पाणीवाटप करार करण्यात आला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारताने सिंधू करार स्थगित केला. त्यातच आता सिंधू आणि झेलम नद्यांमधील पाण्याची पातळी कमालीची घसरलीय. याचा परिणाम पाकिस्तानमधल्या शेतीवर होणार आहे. सुमारे १ कोटी ६० लाख हेक्टर शेतजमीन धोक्यात आलीय. कराची आणि लाहोरसारख्या मोठ्या शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सिंधू नदीवर अवलंबून असलेल्या जलविद्युत प्रकल्पांमुळे पाकिस्तानच्या २५ टक्के वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरून नवीन मुद्दा उपस्थित केलाय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे समन्वयक राणा इहसान अफझल यांनी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याचा इशारा दिलाय. भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखू शकतो, असा पाकिस्तानचा व्होरा आहे. खरं तर पाकिस्तानचा ब्रह्मपुत्रा नदीशी काही संबंध नाही. कारण ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमधील यारलुंग त्संगपो नदी म्हणून ओळखलं जातं. हीच ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि आसाममधून बांगलादेशात जाते. डिसेंबर २०२४ मध्ये चीनने यारलुंग त्संगपो नदीवर जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण बांधण्याची घोषणा केली. या धरणामुळे भारतात विशेषतः पावसाळ्यात पुराचा धोका वाढू शकतो. चीन मोठ धरण बांधणार असला तरी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पूर्णपणे रोखण्याची चीनची योजना नाही. तरीही पाकिस्तानच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याच्या धमकीमुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनचं धरण भारतासाठी चिंतेचा विषय असला तरी पाणी पूर्णपणे रोखणं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. तसं केल्यास पर्यावरण आणि भौगोलिक परिणामांचा धोका निर्माण होऊ शकतो.
Chenab Bridge : १३०० मीटर लांब, ४६७ मीटर ऊंच...पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी ( ६ जून) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच ...