देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

  46

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने आज, बुधवारी सकाळी जाहीर केले आहे.


देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मात्र, ३२८१ रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



कोरोनामुळे केडीएमसी क्षेत्रात एकाचा मृत्यू


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आजच्या कोरोना रुग्णांची संख्या शून्य असून एकूण रुग्णांची संख्या १३ झाली आहे. यापैकी खासगी रुग्णालयात एक रुग्ण दाखल असून ७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ असून गृह विलगीकरण २ रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आजचा मृत रुग्ण डोंबिवलीतील ७७ वर्षांची व्यक्ती असून २८ मे रोजी खासगी हॉस्पिटल डोंबिवली येथे अॅडमिट होते. या रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट २९ मे रोजी केली गेली असता ती ३० मे रोजी पॉझिटिव्ह आली होती. या व्यक्तीला सहव्याधी म्हणजे कॅन्सरचा त्रास होता. या रुग्णाचा मृत्यू काल सकाळी खासगी हॉस्पिटलमध्ये झाला आहे. या व्यक्तीने कोविड लस घेतलेली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी दिली आहे.



वसई विरार मध्ये कोरोनाचे ६ संशयित रुग्ण


राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच वसई विरार मध्ये ६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ६ हजार ९९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय, चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये