Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ठाण्यात उद्या पाणीपुरवठा बंद

ठाण्यात उद्या पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, ०४ जून रोजी स ९.०० ते रा. ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवार ०४ जून रोजी घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील.

दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा