Stock Market News: शेअर बाजारात पुन्हा एकदा युटर्न ! गिफ्ट निफ्टी वाढल्यानंतरही शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीचा दणका सेन्सेक्स २७७.६२ तर निफ्टी ६२ अंशाने घसरला

  46

प्रतिनिधी: गिफ्ट निफ्टी निर्देशांकात किंचित उसळी घेतल्यानंतर पुन्हा शेअर बाजारात शाश्वती दिसत आहे. शेअर बाजारात प्री ओपन सत्रात १२२.१३ अंशाने उसळी घेतली आहे. काल बाजारात अस्थिरता (Volatility) कायम होती. सकाळी गुंतवणूकदारांना नुकसान झाल्यानंतर बंद होताना बाजारात सेन्सेक्स (Sensex) ७७.२६ अंशाने घसरत ८१३७३ निर्देशांकावर (Index) तर निफ्टी (Nifty) ३४.१० अंशाने घसरत २४७१६ निर्देशांकावर स्थिरावला होता. बाजारातील वैश्विक दबाव अमेरिका चीन यांच्यातील व्यापार मतभेद, तसेच भारतातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) यावरील जाणकारांचे मत यांचा एकत्रित परिणाम बाजारावर झाला होता. मात्र आजची परिस्थिती बदलली असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा, संस्थात्मक गुंतवणूकदारांचा बदललेला कल यामुळे बाजाराने पुन्हा एकदा उसळी (Rebound) घेतली आहे. यापूर्वी कालच्या अखेरच्या टप्प्यात मेटल समभाग (Stocks) मध्ये मोठी घसरण झाली तरी पीएसयु, एफएमसीजी, रिअल्टी, फार्मा कंपन्यांच्या समभाग वधारल्याने बाजारात किमान पाठिंबा (Support) निर्देशांकात दिसून आला होता.

सकाळच्या सत्रात ९.३० वाजेपर्यंत शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. पुन्हा सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २७७.६२ अंशाने घसरत ८१०९६ निर्देशांकावर तर निफ्टी ५० (Nifty 50) ६२.९० अंशाने घसरत २४६५३ वर पोहोचले आहे. गिफ्ट निफ्टीने उसळी मारल्यावर अपेक्षा वाढल्या तरी बाजाराने पुन्हा एकदा ' युटर्न ' घेतला आहे. परिणामी सेन्सेक्स बँक निर्देशांकात (Sensex Bank Index) २७५.१६ अंशाने घसरत ६३००८ वर तर ०.२० टक्क्यांनी वाढत ४५४७६ अंकावर तर निफ्टी बँक निर्देशांक ३७ अंशाने घसरत ५५८६५ अंकावर पोहोचला आहे.

बीएससीत (BSE) एम अँड एम, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स, एशियन पेंटस, टाटा स्टील, केआयओसीएल (KIOCL) , रेडिओ खैतान, दीपक फरर्टिलायझर, फिनोलेक्स केबल्स या समभागात सकाळी वाढ झाली आहे तर येस बँक, सूझलोन एनर्जी, आयएफसीआय, जे के लक्ष्मी सिमेंट, अदानी एंटरप्राईजेस, लार्सन, बजाज फायनान्स, एचयुएल, अदानी पोर्टस, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक या समभागात घट दिसून येत आहे.एनएससीत (NSE) एम अँड एम, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी बँक, हिंदाल्को,बजाज ऑटो, टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, टाटा स्टील,टाटा मोटर्स, रेडिओ खैतान, दीपक फरर्टिलायझर, फिनोलेक्स केबल्स या समभागात (Shares) मध्ये वाढ दिसली तर ॲपटस व्हॅल्यु, येस बँक, ओला इलेक्ट्रिक, आयएफसीआय, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अदानी एंटरप्राईजेस, आयसीआयसीआय बँक, लार्सन, एचयुएल, मारुती सुझुकी या समभागात घट झाली आहे.

यामुळे आज अखेरचा सत्रात बाजाराची हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) व घरगुती किरकोळ गुंतवणूकदार (Domestic Investors) यांच्या गुणात्मक संख्याबळाचा बाजारातील निर्देशांकावरील परिणाम होण्याची शक्यता दर्शविली जात आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :