Sana Yusuf Death : 'ती'च्या घरात घुसला अन्... पाकिस्तानी टिकटॉक स्टारची भयंकर हत्या

इस्लामाबाद : पाकिस्तानी टिकटॉक स्टारची घरात घुसून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सना युसूफ असे या पाकिस्तानी टिकटॉक स्टारचं नावं आहे. इस्लामाबादमध्ये सनाची हत्या करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जी-१३ सेक्टरमधील सना युसूफच्या घरात घुसून तिच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेले.पाकिस्तान पोलिसांना संशय आहे की, हल्लेखोर सना युसूफचा ओळखीचा होता आणि तो घरात पाहुणा म्हणून घुसला होता. सना युसूफवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. या हत्येचे अद्याप कारणही समोर आलेले नाही.


सना युसूफ ही पाकिस्तानी टिकटॉकस्टार होती जिचे लाखो फॅन्स होते आणि तिची लोकप्रियता सतत वाढत होती. परंतु रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मुलीची पाकिस्तानात घरात घुसून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सना युसूफचे दोन फोटो व्हायरल होत आहे. एका फोटोमध्ये ती हसत आहे आणि दुसरा फोटो रक्ताने माखलेले आहे.



सना एक लोकप्रिय टिकटॉक स्टार होती. तिने आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून मोठी फॅन फॉलोइंग तयार केली होती. तिच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपीला पकडले जाईल, अशी अपेक्षा आहे. सना युसूफच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी धीर मिळो, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.


सना युसूफच्या हत्येमुळे पाकिस्तानातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

H-1B व्हिसा वाढीव शुल्क फक्त नवीन अर्जदारांनाच! अमेरिकेचे नवे स्पष्टीकरण

वॉशिंग्टन: ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू करण्याच्या घोषणेनंतर, H-1B व्हिसाच्या ७०% पेक्षा जास्त वाटा असलेल्या

अमेरिकेसह युरोपमधील तीन प्रमुख विमानतळांवर CYBER ATTACK

वॉशिंग्टन: आज शनिवारी युरोप देशात सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे युरोपीय देशात

२४ तासांत अमेरिकेत परत या! मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉनचे एच-१बी, एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना आदेश

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणात बदल केला असून यापुढे एच १बी व्हिसासाठी

सौदी अरेबियासोबतच्या नवीन करारानंतर पाकड्या हवेत! भारताविरुद्ध ओकळी गरळ

भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल, पाकिस्तानच्या संरक्षण

अमेरिकेचा एच-1-बी व्हिसा महागला; भारतीयांना बसणार फटका तर अमेरिकन कंपन्यांसमोर नवी आव्हाने

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे भारतीय कामगारांना फटका बसण्याची शक्यता वॉशिंग्टन: अमेरिकेने H-1B व्हिसा अर्ज

अमेरिका आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर, मुडीजचा इशारा

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन जे काही निर्णय घेत आहे त्याचे प्रतिकूल परिणाम अमेरिकेच्या