जैशचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा पाकिस्तानात रहस्यमय मृत्यू

कराची : पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे रहस्यमय मृत्यू होत आहेत. जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसर याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


गुप्त ठिकाणी राहणारा, भारतविरोधी कटांमध्ये सहभागी असलेला अब्दुल अजीज इसर हा जैशचा प्रभावशाली आणि धोकादायक दहशतवादी मानला जात होता. मात्र, त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसतानाही, तो अचानक मृतावस्थेत सापडला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


याआधीही असेच प्रकार घडले आहेत. लश्करचा टॉप कमांडर सैफुल्ला खालिद यालाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केलं होतं. पाकिस्तानात गेल्या काही वर्षांत १५ पेक्षा अधिक कुख्यात दहशतवादी अज्ञात हल्ल्यांमध्ये ठार झाले आहेत. हे सर्वजण भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.



याच वर्षी मार्चमध्ये अबू कताल नावाच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला पाकिस्तानात झेलम परिसरात गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. तो एनआयएच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत होता आणि जम्मू-कश्मीरमधील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता.


दरमयान, पाकिस्तानमध्ये सुरू असलेली ही अज्ञात ‘साफसफाई मोहीम’ भारतासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Comments
Add Comment

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

डोनाल्ड ट्रम्प यांना २४ तासात उपरती; म्हणाले, मोदी उत्कृष्ट आणि महान पंतप्रधान

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपली

इम्रान खान यांच्या बहिणीवर फेकली अंडी!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीवर अंडी फेकण्यात आल्याची

नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Afghanistan Earthquake: २२०० जणांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये भूकंप, अन्न आणि औषधांचा प्रचंड तुटवडा

काबूल: जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते, गुरुवारी आग्नेय अफगाणिस्तानला ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप आला.

"पंतप्रधान मोदी खूपच हुशार" अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना भारताची माफी मागण्याचे केले आवाहन

टॅरिफ शून्य करून भारताची माफी मागण्याचे एडवर्ड प्राइस यांनी डोनाल्ड ट्रम्पना केले आवाहन वॉशिंग्टन: