कुलाब्यातील १० ठिकाणी पार्किंग मोफत- पालिकेचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : कुलाबा येथील १० ठिकाणी नवीन निविदा निघेपर्यंत पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. पालिकेने १ जूनपासून १० ठिकाणी पे-अॅड-पार्क सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेत स्थानिक रहिवाशांसाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलेल्या मागणीनंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.


कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट आणि कफ परेड परिसरातील १० प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग उपलब्ध करून दिले आहे. ऑपरेटर जास्त शुल्क आकारत आहेत किंवा योग्य परवानगीशिवाय पैसे वसूल करीत आहेत, अशा तक्रारीनंतर दक्षिण मुंबईतील प्रमुख भागांत यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तात्पुरती उपाययोजना असली तरी ती अत्यंत आवश्यक होती. वारसा आणि पर्यटनाचे केंद्र असलेल्या या वॉर्डमध्ये अनेक सरकारी कार्यालये, व्यावसायिक केंद्रे आणि सांस्कृतिक स्थळे असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. नवीन पे अँड पार्क धोरण आराखडा लागू होईपर्यंत ही मोफत पार्किंग व्यवस्था सुरू ठेवावी.


या वेळी पालिकेने कठोर पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करावी, अशी मागणीही मकरंद नार्वेकर यांनी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पालिकेने आपल्या पार्किंग धोरणात सुधारणा करावी. संशयास्पद चालणाऱ्या सेवांसाठी नागरिकांना पैसे देण्यास भाग पाडले जाऊ नये, असेही मकरंद नार्वेकर म्हणाले. रहिवाशांकडून असंख्य तक्रारी आल्यानंतर नार्वेकर यांनी ६ मे रोजी महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहून मागणी केली होती. हॉर्निमन सर्कल, जमनालाल बजाज मार्ग, दोराबजी टाटा रोड, इरॉस सिनेमासमोरील ट्रॅफिक आयलंड, वालचंद हिराचंद मार्ग, रामजीभाई कामानी मार्ग (पश्चिम बाजू), करिबोय मार्ग, बद्रद्दीन तय्यबजी मार्ग, मुद्रणा शेट्टी लेन, चिंचोळी लेन, व्ही. एन. रोड, होमजी स्ट्रीट आणि नागीनदास मास्टर लेन,

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य