
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे सत्र सुरुच आहे. कंपनीने ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने ६,००० लोकांना कामावरून कमी केले होते. कंपनीने नेमके कोणते कर्मचारी किंवा विभाग यावेळी कमी केले, हे सांगितलेले नाही. पण मागील वेळेस सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांना जास्त फटका बसला होता. याहीवेळी ही अशाच पदांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, ही कर्मचाऱ्यांची कपात चुकीच्या कामासाठी नाही, तर कंपनीची पुढील योजना लक्षात घेऊन केली आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर भर देत आहे. काही प्रकल्पांमध्ये ३०% कोड एआयद्वारे तयार होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने ८० अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.

बेंचमार्क निर्देशांकात विशेषतः बँक निर्देशांकात मोठी पडझड मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठ्या प्रमाणात पडझड कायम राहिली आहे. ...