कापुरबावडी येथे यू-गर्डर उभारणीचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण

  38

मेट्रो मार्ग क्र. ४ येथे ८ गर्डर स्थापित


मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ (वडाळा–गाईमुख) अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या कापुरबावडी स्थानक प्रकल्पामध्ये एका रात्रीत ८ यू-गर्डर्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले. सदर कार्यवाही ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वपूर्ण प्रगतीचा टप्पा म्हणून नोंदविण्यात येत आहे. हे स्थानक मेट्रो मार्ग क्रमांक ५ (ठाणे – भिवंडी–कल्याण) सोबत एकात्मिक होणारे प्रमुख स्थानक असून तत्वज्ञान विद्यापीठ जंक्शन येथे विकसित केले जात आहे.


या कार्यासाठी एकूण ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये २८ रिगर्स, १० कुशल कामगार, २० अकुशल कामगार तसेच ३५ वाहतूक समन्वय अधिकाऱ्यांचा समावेश होता. कार्याच्या सुरक्षित आणि कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरण्यात आली, ज्यामध्ये १ × ५५० टन क्षमतेची क्रेन, ३ × ५०० टन क्षमतेच्या क्रेन्स, ४ मल्टी-अॅक्सल वाहने, ४ व्होल्वो पुलर्स, ११ काउंटरवेट ट्रेलर्स, ६ मॅनलिफ्ट्स, ६ फराणा क्रेन्स, ४ आयशर ट्रक्स आणि ४ एस्कॉर्ट वाहने यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

आयटीआयमध्ये पुढील महिन्यात होणार २० नवे अभ्यासक्रम

मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरणा २०२५ धोरणामध्ये ‘मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता

म्हाडा मुंबई मंडळातर्फे होणार १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव

नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा

अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, गणेश भक्तांना मिळणार लाभ

मुंबई (प्रतिनिधी): अंगारकी संकष्टी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असल्याने सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी १२

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे