मुंबई : टाईमपास, दृश्यम, बालक पालक यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत अभिनेता प्रथमेश परबने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण प्रथमेशला आता बॉलीवूडमध्ये नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.प्रथमेश पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमात मुख्य नायक म्हणून दिसणार आहे.
नुकतंच सोशल मीडियावर मुहूर्ताचे फोटो पोस्ट करत त्याने ही बातमी शेअर केली. प्रथमेशने शेअर केलेल्या बातमीने अनेकांना आनंदाचा धक्का बसला.
प्रथमेशच्या आगामी सिनेमाचं पॉडर असं आहे. मुव्ही क्लॅप हातात घेतलेले त्याचे फोटो प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "मुख्य नायक म्हणून माझा पहिला हिंदी सिनेमा. उत्सुक असण्यासोबत थोडा नर्व्हसही आहे." असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच अभिनंदन केलं आहे.प्रथमेशने या आधी दृश्यम, दृश्यम 2, खजूर के अटके, अन्य, ताजा खबर यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय मराठीत नुकताच त्याचा मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला.