
जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनेतील महिलेस दिली संधी
विरार : भारतीय जनता पक्षाच्या संघटन शक्तीमध्ये बूथ समितीपासून तर प्रदेश परिषद सदस्यांपर्यंत महिलाशक्ती वाढविण्यावर भर असून, वसईमध्ये -वसई शहर मंडळ अध्यक्षानंतर आता वसई -विरारच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनातील एका महिलेला संधी दिल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदाच महिलाराज आल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मंडळ अध्यक्षापासून तर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी, बूथ समित्या, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक या प्रमाणे प्रदेश परिषद निवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात पार पडला आहे. दरम्यान, प्रत्येक बूथ समितीमध्ये किमान ३ महिला सदस्य घेणे बाबत अनिवार्य करून जास्तीत जास्त महिलांना भाजपासोबत जोडण्याचे काम करण्यात आले आहे. एकंदरीतच महिलांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे.
Home Loan EMI : होम लोनचा EMI होणार कमी, RBI कडून महत्वाचा निर्णय होणार?
मुंबई : होम लोन घेणाऱ्यांसाठी पुढील महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. RBI बँकेडून (आरबीआय) ४ दिवसांत महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयाचा परिणाम ...