Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पॅलेस्टाईनच्या समर्थकाचा अमेरिकेत अतिरेकी हल्ला

पॅलेस्टाईनच्या समर्थकाचा अमेरिकेत अतिरेकी हल्ला
कोलोरॅडो : अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये ज्यू नागरिकांच्या कार्यक्रमात पॅलेस्टाईनच्या समर्थकाने अतिरेकी हल्ला केला. या हल्ल्यात मोलोटोव्ह कॉकटेल या ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली पेटवून नागरिकांवर फेकण्यात आली. बाटलीचा स्फोट झाला आणि आतील ज्वालाग्राही मोलोटोव्ह कॉकटेल नागरिकांच्या अंगावर पडले. यामुळे सहा नागरिक भाजले. हल्लेखोराने मोलोटोव्ह कॉकटेल या ज्वलनशील पदार्थाने भरलेली बाटली पेटवून नागरिकांवर फेकताना 'फ्री पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिली.
पोलिसांनी पॅलेस्टाईन समर्थक हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराचे नाव मोहम्मद साबरी सुलेमान असे आहे. मोहम्मद साबरी सुलेमानची चौकशी सुरू आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने अर्थात एफबीआयने कोलोरॅडोमधील हल्ल्याचे वर्णन अतिरेकी हल्ला असे केले आहे.
मोहम्मद साबरी सुलेमानने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले सहा जण ६७ ते ८८ वयोगटातील आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद साबरी सुलेमानला ताब्यात घेतले आहे, त्याची चौकशी सुरू आहे. मोहम्मद साबरी सुलेमान विरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल, असे पोलीस अधिकारी स्टीफन रेडफर्न म्हणाले. हल्लेखोराला प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या कोणी मदत केली आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment