Wednesday, June 25, 2025

लघुशंकेला विरोध केल्यावर थेट गोळीबार! ६ जण २४ तासात गजाआड

लघुशंकेला विरोध केल्यावर थेट गोळीबार! ६ जण २४ तासात गजाआड

जामखेड : विंचरणा नदीपुलावर लघुशंकेस विरोध करणाऱ्या युवकावर रविवारी रात्री थेट गोळीबार झाला! "इथे महिला आहेत, इथे लघवी करू नका" इतकं बोलल्यावर तिघा गुंडांनी संतापून दोन तरुणांवर गोळ्या झाडल्या. यात कुणाल पवार (२०) हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


ही धक्कादायक घटना रात्री १० वाजता घडली. फिर्यादी आदित्य पोकळे यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर आणि मध्यस्थी करणाऱ्या कुणालवर पिस्तुलातून गोळी झाडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.



मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत खाकीचा धडाका दाखवत मुख्य आरोपी प्रभू रायभान भालेकर (वय ३३, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णु मुळे (वय ४०, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), शरद अंकुशराव शिंदे (वय ३८, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), गणेश गोविंद आरगडे (वय ३०, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), रावबहादुर श्रीधर हारकळ (वय ३५, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (वय ३०, रा.पद्यपुरा, छत्रपती संभाजीनगर) या ६ आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले.


सध्या जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा