Digipin Pincode : आता पिनकोड नाही तर आपला डिजिपिन शेअर करा!

  55

पोस्ट विभागात डिजिटल क्रांती


पिनकोड विसरा, डिजिपिन वापरा


आज आपण जाणून आहोत भारताच्या नव्या डिजिटल क्रांतीबद्दल आणि ही डिजिटल क्रांती घडलीय ती भारतीय पोस्ट विभागात. तिचं नाव आहे डिजिपिन! होय, आता पिनकोडला विसरा आणि डिजिपिन वापरा, असं नवं तंत्रज्ञान भारतीय पोस्ट विभागाने आणलंय. तर चला पाहूयात या लेखातून डिजीपिन सिस्टिम नेमकी आहे तरी काय?



तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण आपला पत्ता सांगताना किंवा देताना शेवटी पिनकोड का लिहितो? खरं सांगायचं तर, तो पिनकोड फक्त एका मोठ्या क्षेत्राची ओळख असते. मग ते भाग शहराचा असो अथवा ग्रामीण. प्रत्येक भागाचा एक पिनकोड ठरलेला असतो. जसा मुंबईच्या बेलार्ड परिसराचा पिनकोड आहे ४००००१. मात्र पिनकोड तुमच्या घराचा नेमका पत्ता सांगू शकत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय पोस्ट विभागाने आयआयटी हैदराबाद आणि इस्रोच्या सहकार्याने एक नवी 'डिजिटल पत्ता' अर्थात डिजिटल अ‍ॅड्रेस सिस्टम विकसित केली. आणि तिचंच नाव आहे डिजिपिन!



डिजिपिन म्हणजे काय?


डिजिपिन ही एक अत्याधुनिक डिजिटल पत्ता सांगणारी सिस्टिम. यामुळे भारतातील कोणत्याही ठिकाणाला एक युनिक डिजिटल ओळख मिळते. यात संपूर्ण देशाला ४ मीटर बाय ४ मीटरच्या छोट्या-छोट्या ग्रिड्समध्ये विभागलं गेलंय. प्रत्येक ग्रिडला १० अक्षरांचा एक युनिक कोड दिला गेलाय. हा युनिक कोड आपण दिलेल्या पत्त्याचं अचूक ठिकाण दर्शवतो. हा युनिक कोड तुमच्या पत्त्याच्या लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूडवर आधारित आहे. मग तुम्ही गल्लीत असा, गावात असा किंवा शहरात, डिजिपिन तुमचा नेमका पत्ता सांगू शकतो.


आता तुम्ही म्हणाल, पिनकोड आणि डिजिपिन यात फरक काय? तर पिनकोड हा ६ अंकी नंबर आहे, जो एका मोठ्या परिसराची, शहराची, जिल्ह्याची, गावाची ओळख सांगतो. तर डिजिपिन हा १० अंकी युनिक कोड आहे. जो तुमच्या घराच्या नेमक्या जागेची अचूक माहिती देतो. उदाहरणार्थ, पिनकोडमुळे कुरिअर तुमच्या परिसरात पोहोचेल, मात्र डिजिपिनमुळे तो थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचेल. थोडक्यात काय तर डिजिपिन ही सिस्टिम अचूकतेवर भर देते.



डिजिपिन कसा मिळवायचा?


अगदी सोपं आहे! तुम्हाला फक्त डिजिपिनच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन टाकू शकता. सिस्टिम तुम्हाला त्या ठिकाणाचा १० अक्षरांचा युनिक डिजिपिन कोड देईल. हा कोड तुम्ही पोस्टातील सेवा, ऑनलाईन डिलिव्हरी किंवा सरकारी कामांसाठीही वापरू शकता. पोस्ट खात्यासाठी ही डिजिक्रांती आहे. या डिजिपिनमुळे आता कोणालाही तुमचा पत्ता शोधण्यासाठी भटकावं लागणार नाही. डिजिपिनमुळे कोणत्याही गोष्टीची डिलिव्हरी जलद, सुलभ आणि अचूक होणार आहे. मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच तुमचा डिजिपिन मिळवा आणि भारताच्या डिजिटल पत्त्याच्या नव्या युगात सहभागी व्हा!

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात