मुंबईत यंदा मलेरिया-डेंग्यूच्या आजारात होणार वाढ

महापालिका राबवणार डास निर्मूलन मोहीम


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढले आहे. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया-डेंग्यूचे संकट गडद होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मंबईतही यंदा मलेरिया-डेंग्यूसह साथेचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टारांचे म्हणणे आहे. यंदा मे महिन्याच्या शेवटाला, म्हणजे मुदतपूर्व मुसळधार पाऊस राज्यात कोसळला असल्यामुळे मुंबई, नागपूर, ठाणे तसेच गडचिरोली भागात साथीच्या आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने मुंबई ठाणे शहरात वारेमाप होणारे बांधकाम आणि ते कमी ठरावे म्हणून सिमेंटच्या रस्त्यांची काढलेली व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे जागोजागी पाणी साचून साथींचा उद्रेक होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


मुंबईत आताच सर्दी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून करोनाचे रुग्ण कोणते व साथीच्या आजाराचे रुग्ण कोणते हे ओळखणेही अवघड झाले आहे. मुंबई महापालिकेने डास निर्मूलन मोहीम अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर आरोग्य विभाग व मुंबई महापालिकेकडून नागरिकांनीही योग्य तीकाळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. ताप, अंगदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे.


पावसाच्या लवकर आगमनामुळे शहरात संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू हा डासांद्वारे पसरणारा व्हायरल आजार आहे. याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याचा प्रसार एडिस एजिप्टी डासांद्वारे होतो. रुग्णांना संसर्गानंतर ५-६ दिवसांत लक्षणे दिसू लागतात. लक्षणेः उच्च ताप, कपाळदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, स्नायुदुखी, चव व भूक मंदावणे, छाती व हातपायांवर पुरळ, मळमळ, उलटी होते. एकूणच साथीच्या आजारांची काळजी घेण्याची गरज असून कोणताही लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.