Leela Hotels IPO - द लीला हॉटेल व रिसोर्ट आयपीओला मोठा प्रतिसाद कंपनीचे शेअर्स ट्रेडिंगसाठी अखेर खुले 'ग्रे बाजारात' इतकी आहे किंमत !

प्रतिनिधी: हॉस्पिटालिटी क्षेत्रातील माहिर व देशातील लक्झरी हाँटेल चेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'द लीला' पॅलेस व रिसोर्ट कंपनीचा आयपीओ (IPO) आज शेअर बाजारात नोंदणीकृत (Listed) झालेला आहे. गुंतवणूकदारांसाठी २६ ते २८ मेपर्यंत हा आयपीओ (Initial Public Offering) बाजारात खुला झाला होता. आता तो नोंदणीकृत झाल्याने लवकरच ट्रेडींगसाठी सुरू होणार आहे. अधिकृत माहितीनुसार हा आयपीओ गुंतवणूकदारांनी साडेचार पटीने सबस्क्राईब केला होता. या आयपीओच्या यशाने भारतीय बाजारात गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मुख्यत्वे शेअर बाजारातील गेल्या काही दिवसातील बाजारातील अस्थिरतेमुळे नवीन गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माहितीनुसार बीएससी व एनएससी बाजारात ४१३ ते ४३५ रुपये प्रति समभाग (Share) किंमतीवर निर्देशित होऊ शकतो.

लीला हॉटेलच्या आयपीओत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (Qualified Institutional Buyers) साठी ७५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी आरक्षित होता. तर सामान्य किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण आयपीओतील १० टक्के वाटा आरक्षित होता. आयपीओत ४३५ रुपये प्रति शेअर किंमत म्हणून प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला होता.कंपनीला मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मधील तुलनेत यंदा ३१ मार्च २०२५ पर्यंत तब्बल २३४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील महसूलातील (Revenue) १२२६.५० कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १५ टक्क्यांनी वाढ होत महसूल १४०६.५६ कोटींवर पोहोचला आहे.

आज सकाळी १० पासून या कंपनीने स्पेशल प्री ओपन सेशन (SPOS) सदरात बाजारात भाग घेत आपले प्रवेशद्वार गुंतवणूकदारांसाठी खुले केले आहे. लीला पॅलेसचे देशभरात १२ ठिकाणी वास्तव्य असून रिसोर्टिंग क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. आतापर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांनी एकूण आयपीओतील ८३ टक्के सबस्क्राईब खरेदी केले होते.सध्याची परिस्थिती पाहता या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विश्लेषकांनी या आयपीओत दूरदृष्टीने विचार करून मोठ्या काळासाठी गुंतवणूक करायचा सल्ला दिलेला आहे.आगामी काळात या आयपीओला बाजारात ट्रेडिंगला किती प्रतिसाद मिळेल ते कळणारच आहे मात्र तज्ञांच्या मते सुरूवातीची २ ते ३ वर्ष या आयपीओत गुंतवणूकदारांसाठी जोखमीची असतील.

ग्रे मार्केट (Grey Market) मध्ये म्हणजेच अनाधिकृतपणे या शेअरची किंमत दोन रुपये प्रिमियम दराने सुरू असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली होती.स्क्लॉस बंगलोर लिमिटेड (The Leela Hotels and Resorts) कंपनीचे समभाग (Shares) सकाळी १०.५७ वाजता बीएसईवर ६.७७% वाढून ४३४ रुपयांवर पोहोचले, आयपीओच्या ४३५ च्या किमतीच्या तुलनेत ४०६.५० वर बाजारात सुरुवातीला समभाग सूचीबद्ध झाले होते. लीला हॉटेल्सचा ३,५०० कोटी रुपयांचा आयपीओ हा २,५०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रवर्तक (Promoter) प्रोजेक्ट बॅलेट बंगळुरू होल्डिंग्ज (DIFC) द्वारे १,००० कोटी रुपयांच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) बाजारात दाखल झाला होता.लीला हॉटेलच्या मुख्य कंपनीचे नाव Schloss Bangalore Limited असून कंपनीची स्थापना २०१९ साठी झाली होती.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र