

Norway Chess : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
ओस्लो : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ...
तीन जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम रबवली जात आहे.
१५०० पर्यटक अडकले
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले की, ११५ पर्यटक लाचेनमध्ये आणि १,३५० पर्यटक लाचुंगमध्ये राहत आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.