Gold Silver Rate Today: सोन्या चांदीच्या भावाची 'गगनभरारी' अमेरिकन बाजारातील सोन्याच्या मागणीनंतर सोने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!

  56

प्रतिनिधी: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घट झाली होती. अर्थविश्वात चाललेल्या घडामोडी पाहता देशात व परदेशात सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय बाजारात मागणीपेक्षा पुरवठ्यात घट झाल्याने सोन्याच्या भावाने आज पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. सकाळपर्यंत सोन्याच्या भावात कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम तब्बल ३३ रूपयांनी वाढ झाली आहे. मोघमपणे विचार केल्यास सोन्याच्या भावात देशभरात प्रतितोळा २०० रुपयांनी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स या संकेतस्थळावरील माहितीनुसार २४ कॅरेट प्रकाराच्या सोन्याच्या भावात प्रति कॅरेट ३३ रूपयांनी वाढ झाली असुन दर ९३७१ रूपयांवर पोहोचला आहे तर २२ कॅरेट प्रकाराच्या सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम ३० रूपयांनी वाढ होत सोने ८९२० रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २४ रुपयांवर पोहोचली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'अमेरिकन फर्स्ट ' या धोरणानंतर त्याचे पडसाद नासडाक (NASDAQ) व डाओ जोन्स (Dow Jones) मध्ये पाहिला मिळाले. शुक्रवारी दिवसाआखेर अमेरिकन बाजारात नासडाकमध्ये ९.६ टक्क्याने तर डाओ जोन्स बाजारात ३.९ टक्क्यांनी वाढ झाली होती. डिसेंबर २०२३ नंतर अमेरिकन बाजाराने गाठलेला प्रथमच उच्चांक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बाहेरील वस्तूंच्या आयातीवरील वाढविलेल्या भरमसाठ करा नंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेत उत्पादनाला चालना मिळू शकते. परिणामी महागाई (Inflation) आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच अमेरिकन बाजारात तरलता नियंत्रित करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक सुरू केली‌.परिणामी भारतीय बाजारातील सोने मागणीतील संभाव्यता वाढल्याने बाजारात भाववाढ अपेक्षित होते. रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात करुन बाजारातील तरलता वाढवू शकते. आगामी मागणीतील वाढ होण्यापूर्वीच भारतीय घरगुती गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ सुरू केली.

ट्रम्प प्रशासनाने युरोपियन युनियनच्या वस्तूंवरील ५० टक्के कर पुढे ढकलल्याने सुरक्षित-निवासस्थानांची मागणी तात्पुरती कमी झाली असली तरी, युक्रेन आणि गाझामधील सुरू असलेल्या संघर्षामुळे, तसेच अमेरिकेच्या आर्थिक डेटामध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदार अनिश्चित झाले आहेत. किंमतीच्या घसरणीच्या वेळी धोरणात्मक खरेदीवर लक्ष केंद्रित करून कमोडिटी (Commodity) तज्ज्ञांनी भविष्यातील तरतूद म्हणून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला आहे.मुंबईत सद्यस्थितीत सोन्याची प्रति तोळा किंमत ९७८५० रुपयांवर पोहोचला आहे. सकाळच्या सत्रात अमेरिकन गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) तब्बल १.४० टक्क्यांनी वाढत ३३६१.७० रूपयांवर पोहोचला आहे. भारतीय मल्टी कमोडिटी एक्सचेंज बाजारात (MCX) वर सोन्याचा निर्देशांक १.०५% वाढत किंमत ९६८८६ रुपयांवर व चांदी निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी वधारत ९७६२२ रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीतही प्रति किलो भाववाढ !

सराफ बाजारात चांदीच्या निर्देशांकात वाढ होत चांदीच्या दरात तुलनात्मकदृष्ट्या वाढ झाली आहे. सरासरी प्रति किलो चांदीच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे.
Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील