Sunday, August 24, 2025

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते नाशिकमधील इगतपुरी दरम्यानचा ७६ किमीचा अखेरचा टप्याचे लोकार्पण येत्या गुरुवारी, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका विशेष सोहळ्यात या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल.

समृद्धी महामार्गामुळे मुंबईहून जातांना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे प्रवसातील अंतर कमी आणि वेगवान झाले आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जातांना ३ तास ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे २ तास ३० मिनिटे इतका कमी झाला आहे. म्हणजेच १ तास २० मिनिटे वाचून सूमारे ४० किमी. अंतर कमी झाले आहे.

७.७४ किमीच्या शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या वाशाळा येथील बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणे अतिशय सोपे झाले आहे. ३६ मीटरची रुंदी आणि ६ पदरी महामार्गामुळे प्रवास जलद होणार आहे.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, इगतपुरी-आमणे या उर्वरित टप्प्याचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते. आता हा मार्ग सुरू झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांशी असलेली मुंबईची जोड अधिक जलद, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment