Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Ladki Bahin Yojna Money Update: महिलांनो लाडकी बहिणीचा 11वा हफ्ता वटपौर्णिमेला मिळणार?

Ladki Bahin Yojna Money Update: महिलांनो लाडकी बहिणीचा 11वा हफ्ता वटपौर्णिमेला मिळणार?

मुंबई: राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojna) ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान आता योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाही आहेत, तसेच त्याबाबत कोणतीच घोषणा देखील झाली नाही. त्यामुळे मे महिन्याचा हफ्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना २०२४ मध्ये सुरू केलेली आतापर्यंतची महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत दहा हप्त्याचे वितरण पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे, पात्र महिलांना आतापर्यंत १० महिन्याचे १५०० रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र आता प्रतीक्षा मे महिन्याच्या म्हणजेच अकराव्या हफ्त्याची आहे. तर हा हफ्ता जून महिन्याच्या हफ्त्यासोबत एका मोठ्या मुहूर्ताच्या दिवशी मिळेल अशी सर्व बहिणींना आशा लागून राहिली आहे.

दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा