Visa Free Country for Indians: आता या देशातही भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री

भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री देणाऱ्या देशांच्या यादीत आता आणखीन एका देशाची नव्याने भर पडली आहे.


मनिला: जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय लोक व्हिसाशिवायही जाऊ शकतात. भूतान, नेपाळ, श्रीलंका या भारताला लागून असलेल्या, तसेच भारतापासून जवळ असलेल्या मलेशियाला जाण्यासाठी देखील भारतीयांना व्हिसाची गरज पडत नाही. तर या यादीत आणखीन एका देशाची भर पडली आहे. तो देश आहे फिलीपिन्स..

फिलीपिन्सला जाण्यासाठी तुम्हाला आता भारतीयांना व्हिसाची गरज पडणार नाही. नवी दिल्लीतील फिलीपिन्स दूतावासाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना आता आधीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.  फ्री व्हिसाद्वारे केवळ पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनाच परवानगी मिळेल. याशिवाय एखाद्या दुसऱ्या कारणासाठी जायचं असेल तर ई-व्हिसा माध्यमातून जावं लागेल.

14 दिवसांची फ्री-व्हिसा एंट्री


भारतीय पासपोर्ट असल्यास केवळ पर्यटनासाठी कुणीही केवळ 14 दिवसांसाठी विना व्हिसा फिलीपिन्समध्ये जाऊ शकतात. फिलिपिन्समध्ये 14 दिवसांसाठी मुख्य विमानतळं, बेट आणि क्रुज टर्मिनलवर प्रवेशाची परवानगी असेल. मात्र यासाठी काही अटी देखील आहेत, ते देखील जाणून घेणे गरजेच्या आहेत.

फिलिपिन्समध्ये फ्री व्हिसा एंट्रीच्या अटी



  • उद्देश केवळ पर्यटन असावा.

  • पासपोर्ट प्रवासासाठी सहा महिन्यांसाठी वैध असावा.

  • फिलीपिन्समध्ये राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग, तिकीट दाखवावं लागेल, तसेच तुमच्या बँकेत पुरेसे पैसे असायला हवेत.

  • फिलीपिन्सला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना तेथील करन्सी आणि भारतीय रूपयामधील अंतर, त्याची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. फिलीपिन्समध्ये पेसो करन्सी चालते. तिथे गेल्यावर भारतीय रूपये पेसोमध्ये बदलून घ्यावे लागतात. इथे 100 रूपये म्हणजे 65 पेसो होतात.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त