
भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री देणाऱ्या देशांच्या यादीत आता आणखीन एका देशाची नव्याने भर पडली आहे.
मनिला: जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय लोक व्हिसाशिवायही जाऊ शकतात. भूतान, नेपाळ, श्रीलंका या भारताला लागून असलेल्या, तसेच भारतापासून जवळ असलेल्या मलेशियाला जाण्यासाठी देखील भारतीयांना व्हिसाची गरज पडत नाही. तर या यादीत आणखीन एका देशाची भर पडली आहे. तो देश आहे फिलीपिन्स..
फिलीपिन्सला जाण्यासाठी तुम्हाला आता भारतीयांना व्हिसाची गरज पडणार नाही. नवी दिल्लीतील फिलीपिन्स दूतावासाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना आता आधीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. फ्री व्हिसाद्वारे केवळ पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनाच परवानगी मिळेल. याशिवाय एखाद्या दुसऱ्या कारणासाठी जायचं असेल तर ई-व्हिसा माध्यमातून जावं लागेल.
14 दिवसांची फ्री-व्हिसा एंट्री
भारतीय पासपोर्ट असल्यास केवळ पर्यटनासाठी कुणीही केवळ 14 दिवसांसाठी विना व्हिसा फिलीपिन्समध्ये जाऊ शकतात. फिलिपिन्समध्ये 14 दिवसांसाठी मुख्य विमानतळं, बेट आणि क्रुज टर्मिनलवर प्रवेशाची परवानगी असेल. मात्र यासाठी काही अटी देखील आहेत, ते देखील जाणून घेणे गरजेच्या आहेत.
फिलिपिन्समध्ये फ्री व्हिसा एंट्रीच्या अटी
- उद्देश केवळ पर्यटन असावा.
- पासपोर्ट प्रवासासाठी सहा महिन्यांसाठी वैध असावा.
- फिलीपिन्समध्ये राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग, तिकीट दाखवावं लागेल, तसेच तुमच्या बँकेत पुरेसे पैसे असायला हवेत.
- फिलीपिन्सला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना तेथील करन्सी आणि भारतीय रूपयामधील अंतर, त्याची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. फिलीपिन्समध्ये पेसो करन्सी चालते. तिथे गेल्यावर भारतीय रूपये पेसोमध्ये बदलून घ्यावे लागतात. इथे 100 रूपये म्हणजे 65 पेसो होतात.