Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पहिल्यांदाच जिंकल्याचा जल्लोष गेला नियंत्रणाबाहेर, किंकाळ्या आणि जाळपोळीने घेतले रूप

पहिल्यांदाच जिंकल्याचा जल्लोष गेला नियंत्रणाबाहेर, किंकाळ्या आणि जाळपोळीने घेतले रूप

PSG चॅम्पियन्स लीग विजेता; फ्रान्सभर गोंधळ – २ मृत्यू, ५०० हून अधिक अटकेत

फ्रान्स : फ्रान्समधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मेन (PSG) ने पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली आहे. ३१ मे २०२५ रोजी म्युनिक येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी इंटर मिलानला ५-० ने पराभूत केलं. या ऐतिहासिक विजयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मात्र, आनंदोत्सवाचा हा उत्साह काही ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याचे रूपांतर गोंधळ आणि हिंसाचारात झालं.

फ्रान्सच्या विविध भागांत, विशेषतः पॅरिस शहरात, चाहत्यांनी रस्त्यावर फटाके फोडले, गाड्यांचे हॉर्न वाजवले, घोषणा दिल्या. काही ठिकाणी पोलिसांवर वस्तू फेकल्या गेल्या, गाड्या जाळण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हिंसाचाराची स्थिती:

  • २ जणांचा मृत्यू.
  • पॅरिसमध्ये २३ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू.
  • डॅक्स शहरात १७ वर्षीय मुलाचा छातीत चाकूने वार करून खून.
  • १९२ जण जखमी, त्यात २२ पोलीस आणि ७ अग्निशमन कर्मचारी.
  • २६४ वाहने जाळली गेली.
  • ५५९ लोकांना अटक, तर ३०० जणांना ताब्यात.

मुख्य गोंधळ Champs-Élysées रोड आणि Parc des Princes स्टेडियम परिसरात झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

PSG च्या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंद व्यक्त होत असतानाही, त्याचा काही भाग हिंसक आणि बेकायदेशीर वळण घेतल्याचे चित्र दिसून आले.

Comments
Add Comment