माणुसकीचा धर्म

स्नेहधारा : पूनम राणे


दुपारी १ वाजताची वेळ. महिना मे. वैशाख वणव्यातलं रखरखतं उन्ह. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. रस्त्यावर माणसांची तुरळक रहदारी चालू होती. शाळेला लागूनच बस स्टॉपला बसची वाट पाहत मी उभी होते. मध्येच कावळ्याची काव काव, कोकिळेचा आवाज सोबत करत होता. इतक्यात रस्त्यावरून एक वृद्ध माणूस. साधारणत: वय वर्षे ६५.


चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, अस्थिपंजर, पाठीवर मोठं ठेगुळ, पाठीत वाकून अनवाणी चालत असताना पाहिला. भर उन्हात सिमेंट- डांबरीकरणाच्या रस्त्यावरून चालताना त्यांचे पाय पोळले जात होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी बसची वाट पाहत उभी होते. काका, काका म्हणून मी त्यांना आवाज देत होती. इतक्यात एक स्कूटरवरून माणूस आला. त्यांने स्कूटर थांबवली व म्हणाले ‘आजोबा, एवढ्या उन्हात कुठे चाललात?’ आणि पायात चप्पलही नाही. असे अनवाणी चाललात!
त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘‘बाबा, खाण्यापिण्याचे हाल, कपड्यांचे हाल, कुठून आणू चप्पल!”‘‘चला, बसा, माझ्यासोबत.” स्कूटरवर बसा पाठीमागे...
नको, नको, म्हणत असताना त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला हाताला धरून आपल्या स्कूटरवर बसवलं आणि स्कूटर भरधाव वेगाने निघूनही गेली.


मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत उभी होती. मनात विचार येत होते.” कोण म्हणतं मुंबईत माणुसकी संपली! माणुसकी संपलेली नाही.
ही माणुसकी आपण कोरोना काळातही अनुभवली. माणुसकी अजूनही जिवंत आहे. अशा या देव माणसांच्या रूपात. या युगात मानवतेच्या मूल्याची रुजवन होणे अत्यंत गरजेच आहे.

Comments
Add Comment

...म्हणून समाज मोदींना मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी

मराठी पत्रकारितेचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर आचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले

छडी वाजे छमछम

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना

“...हम भी देखेंगे!”

बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी

घेता घेता...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे