Friday, October 24, 2025
Happy Diwali

PBKS vs MI: मुंबई-पंजाब सामन्यात पावसाबाबत वेगळा आहे नियम, जाणून घ्या

PBKS vs MI: मुंबई-पंजाब सामन्यात पावसाबाबत वेगळा आहे नियम, जाणून घ्या
मुंबई: पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी १ जूनला आयपीएलचा दुसऱा क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. मात्र सामना सुरू होण्याआधीच पावसाने अडथळा निर्माण केला आहे. साधारणपणे आयपीएलच्या सामन्याचा निकाल साडेअकरा वाजेपर्यंत येतो. मात्र दुसऱ्या क्वालिफायरबाबत आयपीएलचा नियम वेगळा आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पाऊस सुरू असल्याने सामन्याचा निकाल उशीरा रात्री १ वाजेपर्यंत येऊ शकतो. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना २ तास उशिराने सुरू केला जाऊ शकतो. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. मात्र या सामन्यासाठी अधिकतर १२० मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला आहे. मुंबई-पंजाब सामन्याची वेळ संध्याकाळी साडेसात वाजताची होती. यानुसार जरी साडेनऊ वाजेपर्यंत सामना सुरू झाला असता तरी षटकांत कपात केली गेली नसते. मात्र ९.३०च्या नंतर सामना सुरू झाला तर या वेळेनंतर षटकांमध्ये कपात केली जाईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >