हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या ७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री विजयी झाली. ती मिस वर्ल्ड २०२५ झाली. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व नंदिनी गुप्ताने केले. नंदिनी टॉप ८ जणींच्या फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.
ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी पांढऱ्या रंगाचा सजवलेला गाऊन परिधान केला होता. जो समस्या आणि अडचणींवर उपाय, शांतता, समृद्धी आणि धैर्याचे तसेच संयमाचे प्रतिक असल्याचे ती म्हणाली. गाऊनवरील चमकणारे आरसे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट दाखवतात असे ती म्हणाली. ओपलच्या सैंदर्याने तसेच तिच्या चातुर्याने आणि स्टेजवर आत्मविश्वासाने वावरण्याने अनेकांची मनं जिंकून घेतली. वैयक्तिक आयुष्यातही ओपल साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी वावरते. जास्त स्टायलिश किंवा फॅशनेबल राहणे पसंत करत नाही असे ती म्हणाली.
एकूण १०८ जणी ७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यातील ४० जणींची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या ४० जणींमधून थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री मिस वर्ल्ड २०२५ झाली.