Monday, June 2, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भगवान जगन्नाथांच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे टायर

भगवान जगन्नाथांच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे टायर
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे इस्कॉनने आयोजित केलेल्या भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत ४८ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला आहे. भगवान जगन्नाथाच्या रथाला यंदा पहिल्यांदाच भारताच्या सुखोई लढाऊ विमानाचे टायर बसवण्यात आले आहेत. याआधी ४८ वर्ष कोलकाता येथील भगवान जगन्नाथाच्या उत्सवासाठी रथाला बोईंग विमानाचे टायर बसवले जात होते.



भगवान जगन्नाथाच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे चार टायर बसवण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे रथ ओढणे सोपे होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सुखोई विमानाचे टायर तयार करणाऱ्या कंपनीला रथासाठी टायर हवे आहेत हे कळले तेव्हा सुरुवातीला काहीच समजले नव्हते. आयोजकांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर कंपनीने रथासाठी चार टायर देण्याची तयारी दाखवली. यानंतर रितसर करार करुन चार टायर रथासाठी घेण्यात आले आहेत. सध्या रथाला टायर बसवण्याचे काम सुरू आहे.

भगवान जगन्नाथाच्या रथाला सुखोई लढाऊ विमानाचे टायर हा परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम आहे. जेव्हा सुखोई विमानाचे टायर बसवलेला भगवान जगन्नाथाचा रथ उत्सवात सहभागी होईल तेव्हा हा सोहळा बघण्यासाठी अलोट गर्दी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भाविकांसाठी हा एक नवा आणि आनंददायी असा अनुभव असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment