हॉलिवूड गायिका रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचे निधन

  14

लॉस एंजिल्स : प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी लॉस एंजिल्स येथील रुग्णालयात शनिवारी (३१ मे) सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण ते काही काळापासून आजारी होते, अशी माहिती समोर आली आहे.


रिहानाचा भाऊ राजद फेंटी काही दिवसांपूर्वी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन गेला होता. त्यावेळी रोनाल्ड फेंटी सीडर-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेत होते.


सध्या रिहानाकडून त्यांच्या वडिलांच्या निधनावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रिहाना आणि तिच्या वडिलांमधील संबंध काही वर्षांपासून बिघडले होते. २०१९ साली रिहानाने वडिलांवर फेंटी एंटरटेनमेंट या कंपनीच्या नावाचा परवानगीशिवाय वापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर केस दाखल केली होती.


दरम्यान, बारबाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली यांनी रोनाल्ड फेंटी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "ही एक दुःखद बातमी आहे. रिहानाच्या घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी अनेक लोकांवर प्रभाव टाकला आहे," अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

दक्षिण कोरियात माजी राष्ट्रपतींच्या पत्नीला अटक

सियोल : दक्षिण कोरियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम केओन यांना शेअर बाजारातील फसवणूक

सोन्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही- ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली. 'ट्रम्प यांनी सोन्यावर कोणताही कर

युक्रेनची पुन्हा फाळणी होऊ देणार नाही: झेलेंस्की ठाम

काही प्रदेशांच्या अदलाबदलीची ट्रम्प यांची वादग्रस्त भूमिका कीव्ह : रशियाशी सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचा