Sunday, October 26, 2025
Happy Diwali

नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर

नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक झाली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक झाली. या बैठकीला तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री तसेच नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख सरकारी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाज आणि मंत्री दादा भुसे हे पण या बैठकीत उपस्थित होते. बैठकीत सर्वांशी चर्चा करण्यात आली. यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत दहा शैव आखाड्यांचे वीस महंत आणि तीन वैष्णव आखाड्यांचे सहा महंत उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान म्हणण्याऐवजी अमृतस्नान म्हणावे, अशी सूचना महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. ही सूचना सर्वांनी स्वीकारली. यानंतर चर्चा झाली आणि नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होत आहे. दुपारी बारा वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. वेळापत्रकानुसार २४ जुलै २००८ पर्यंत कुंभमेळा पर्व सुरू असेल. नाशिक जिल्हा सिंहस्थ कुंभमेळा २०२६ - २७ पुरोहित संघ नाशिक आषाढ कृ ५, शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ - ध्वजारोहण आषाढ कृ ३०, सोमवार २ ऑगस्ट २०२७ - प्रथम अमृतस्नान, सोमवती अमावस्या श्रावण अमावस्या, मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७ - द्वितीय अमृतस्नान, अमावस्या भाद्रपद शु. ११, शनिवार ११ सप्टेंबर २०२७ - तृतीय अमृतस्नान, एकादशी आषाढ तृतीया, सोमवार २४ जुलै २०२८ - कृष्णतृतीया, सिंहस्थ समाप्ती पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर अश्विन कृ ६, शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ - ध्वजापर्व, गुरुसिंह राशिप्रवेश, सिंहस्थ प्रारंभ आषाढ कृ ३०, सोमवार २ ऑगस्ट २०२७ - प्रथम अमृतस्नान, दर्शअमावस्या, सूर्यग्रहण श्रावण कृ ३०, मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७ - द्वितीय अमृतस्नान, मुख्यपर्व भाद्रपद शु १२, रविवार १२ सप्टेंबर २०२७ - तृतीय अमृतस्नान, वामन एकादशी श्रावण शु ३, सोमवार २४ जुलै २०२८ - ध्वजावतरण, सिंहस्थ समारोप
Comments
Add Comment