मुलांनो सुट्टी सत्कर्मी लावा

वैशाली पाटील


उन्हाळा आणि सुट्टी हे समीकरण सर्व ज्ञात आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करण्यात वेळ कधी आणि कसा निघून गेला समजलेच नाही. या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पुढे कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. कोणते करिअर निवडायचे आहे याचा विचार करायचे राहूनच जाते. सुट्ट्या संपल्या की आपण मित्र-मैत्रिणींना भेटून कोण कोणते करिअर करणार याची चर्चा करायला लागतो. सुट्ट्यांमध्ये नातेवाईक, भावंड, मित्र- मैत्रिणींसोबत मज्जा केलेली असते. आता वेळ आलीय ती मेहनत करण्याची. मेहनत केली तर पुढील आयुष्यात मज्जाच मज्जा करायला मिळेल अशी पालकांची सूचना मिळत जाते.


स्वामी विवेकानंद म्हणायचे, कामातील बदल म्हणजेच विरंगुळा. मज्जा करू नका असं तुम्हाला कोणीच म्हणणार नाही. मज्जा करणं विरंगुळा हे महत्त्वाचं आहेच; परंतु सध्याच्या अति तीव्र स्पर्धेच्या आणि झटपट बदलणाऱ्या जगात सृजनात्मक आणि योजनापूर्वक विरंगुळा हा प्रभावशाली आणि फायद्याचा ठरतो.


सध्याच्या मुलांसाठी सुट्टीचा वापर शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी केला तर पुढील काळात फलदायी आणि सर्जनात्मक होऊ शकेल.


१. अभ्यासक्रमाची ओळख करून घेणे
जर तुमची पुढील शिक्षणाची दिशा ठरली तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमाची ओळख करून घेणे उपयुक्त ठरेल.
कमकुवत विषयांवर लक्ष : ज्या विषयांमध्ये तुम्हाला अडचण येते, त्या विषयांची पुनरावृत्ती करा.
प्रैक्टिकल कौशल्ये : विज्ञान विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील प्रयोगांचा सराव करता येईल. तसेच काही मूलभूत कौशल्ये जसे की घरकाम, थोडं फार जेवण बनवणे, घरातील उपकरणांची माहिती या गोष्टींच्या भविष्यकाळात परदेशात शिक्षणासाठी गेल्यास उपयोगी ठरतील.


२. नवीन कौशल्ये शिकणे
संगणक कौशल्ये : प्रोग्रॅमिंग (Python, Java), ग्राफिक डिझाइनिंग किंवा वेब डेव्हलपमेंट शिकणे.
भाषा शिक्षण : इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, जपानी, मंडारीन यांसारख्या परभाषा शिकण्याचा प्रयत्न करा.
क्रेडिट कोर्सेस : ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून लहान अभ्यासक्रम करून प्रमाणपत्रे मिळवा.


३. व्यक्तिमत्त्व विकास
वाचन संस्कृती : प्रेरणादायी पुस्तके, गोष्टीची पुस्तके, चरित्रे, बातम्यापत्रे वाचून ज्ञानवर्धन करा. यामुळे विचारांना चालना मिळते, शब्दकोश वाढतो आणि सुंदर व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य : टेड टॉक्स ऐकणे, डिबेट स्पर्धांमध्ये सहभागी होणे. आपापल्या ग्रुपमध्ये टेड टॉक्स आयोजित करणे अतिशय मजेशीर आणि प्रभावशाली उपक्रम आहे.
लेखन कला : ब्लॉग लिहिणे, कविता किंवा लघुकथा लिहिण्याचा सराव करा.


४. शारीरिक आणि मानसिक आरोग्य
व्यायाम आणि योग : रोजच्या दिनचर्यात व्यायाम, मुक्त खेळ, ध्यान किंवा योगासने समाविष्ट करा.
आरोग्यदायी आहार : पौष्टिक आहार घेणे, तो बनवण्यास आईकडून शिकणे, महत्त्व जाणून घेणे या गोष्टींचे महत्त्व कधीच कमी लेखता येणार नाही.
सर्जनात्मक कला : चित्रकला, संगीत, नृत्य, शिवणकाम, कुंभार काम, भरतकाम यांसारख्या कलांमध्ये रममाण होणे.


५. सामाजिक कार्य आणि स्वयंसेवा
समाजसेवा : जवळच्या एनजीओमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणे.
पर्यावरण जागृती : झाडे लावणे, प्लास्टिकमुक्त अभियानांना पाठबळ देणे.


६. करिअरची रूपरेषा तयार करणे
करिअर मार्गदर्शन : विविध व्यवसायांची माहिती घेणे, करिअर काऊन्सेलरशी संपर्क साधणे.
इंटर्नशिप : लहान प्रमाणात इंटर्नशिप करून व्यावहारिक अनुभव मिळवणे. तसेच बँकिंगशी संबंधित कार्यप्रणाली, दैनंदिन गरजेच्या बँक कामकाजाची प्रत्यक्षदर्शी ओळख करून घ्या.
सुट्टी ही वेळ न दवडता नवीन गोष्टी शिकण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि भविष्यासाठी तयार होण्याची सुवर्ण संधी असते. योग्य नियोजन करून हा काळ सुंदर आणि उपयुक्त बनवता येतो. म्हणून, सुट्टीत स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रांत वाढवण्याचा प्रयत्न करा आणि हो यातील तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करत असताना प्रवास आणि मज्जा करायला विसरू नका.


- “सुट्टी ही विश्रांतीची नसून, स्वतःला उंचावण्याची संधी आहे!”

Comments
Add Comment

गाईमुळे वाघाचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा

ट्रोलिंग : दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे!

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात

हम प्यार का सौदा करते हैं एक बार...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे काही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात

मित्र नको; बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील

सुधारणांच्या वाटेवर..

वेध : कैलास ठोळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताने ‌‘रिफॉर्म एक्सप्रेस‌’मध्ये प्रवेश केला आहे.

सामान्य माणूस खरोखर दखलपात्र आहे?

दखल : महेश धर्माधिकारी  सामान्य माणसासाठी मतदान करणे हा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले